नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
पतंजली योगपीठाच्या स्थापनेला २६ वर्ष पुर्ण झाल्या निमित्य भारत स्वाभिमान व पतंजली योग परिवार बाऱ्हाळी यांच्या वतीने दीप प्रज्वलन व ध्वजारोहण करून स्थापनादिवस साजरा करण्यात आला .
योगऋषी स्वामी रामदेव बाबा व आचार्य बालकृष्ण यांच्या अथांग कष्टाने हे फळ म्हणजे पूर्ण देशात नाही तर जगात योगाचा प्रसार झाले आहे .योगामुळे अनेक जुनाट आजारावर योग व आयुर्वेदाच्या साह्याने यशस्वी उपचार केले.
योग शिक्षणाचे जिवनातील महत्व पटवून देण्यासाठी
उच्च शिक्षण प्राप्त केलेले स्वामी आनंद देवजी महाराज संसाराचा त्याग करून महाराष्ट्रभर निस्वार्थपणे योग साधनेचा प्रचार व प्रसार करत आहेत.
महाराष्ट्र संघटक दत्तात्रय काळे व जिल्हा महिला प्रभारी उर्मिला ताई साजणे जिल्हा प्रभारी अनिल अमृतवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाराहाळी येथे सन्मुख मठदेवरु व महीला प्रभारी बाऱ्हाळी संध्या मठदेवरु यांनी योग अंखडीत ठेवले
या कार्यक्रमात ध्वजारोहण नरसिंग अस्वले यांनी केले तर ध्वजाचे पुजन केशव रापतवार यांनी केले . दिप प्रज्वलन सुर्यकांत बेलुरे मोहन कोंडेवाड व सौ. प्रेमला पंचगट्टे, सौ.मनिषा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ईजत शेख ,भिमराव राठोड, संजय पवार, मनोज मठपती,
सौ.उर्मिला कंदरपळे, आदि कार्यक्रमाला उपस्थित होते.

COMMENTS