प्रतिनिधी । केज
दि.26 : केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील कर्मवीर विद्यालयात, कर्मवीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे जेष्ठ नेते सुनीलआबा गलांडेपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्च 20 च्या माध्यमिक शालांत परिक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त बक्षिस वितरण करण्यात आले.अध्यक्षस्थानी राम कोकीळ (पुणे) हे होते.
प्रथमता भारतीय संविधानातील उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.व त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री दीलीप गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर मार्च 2020 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी कर्मवीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे जेष्ठ नेते सुनिलआबा गलांडेपाटील, सरपंच सुनील देशमुख, राम कोकीळ,प्रकाश राऊत, कर्मवीर शिक्षण संस्थेचे संचालक दगडु दळवे,बाळासाहेब गलांडे, अशोक बर्डे,शिवाजी गायकवाड, रामराजे राऊत , रवींद्र गलांडे, उपसरपंच पवनकुमार पवार,अँड भुजंग गलांडे, नारायण राऊत,ज्ञानोबा पवार,पोलीस पाटील आत्माराम राऊत,मुख्याध्यापक मधुकर सिरसट, सुधाकर ढाकणे,बळीराम नखाते,अशोक शिंदे,आर आर गायकवाड,वैद्यकीय अधिकारी डॉ आसाराम चौरे,डॉ महादेव सांगळे,डॉ गलांडे, संजय महाराज नखाते,सुनील महाराज मेहरकर,चंद्रकांत भुजबळ,पंढरीनाथ काळे,पांडुरंग गलांडे, दगडु गलांडे, जालिंदर गलांडे, मलिकार्जून गलांडे, महादेव लांब,भारत सत्वधर,पत्रकार अनिल गलांडे, नितीन गलांडे, माणिक चोपणे, अशोक पवार, जनक गलांडे, मलिकार्जून गायकवाड,गोरख गायकवाड, आयुब पठाण,नागोराव काळे,धनराज नखाते, विजय माने,महारूद्र लिगाडे,राजाराम गलांडे, विजय काळे,शरद गलांडे, अंकुश निंगूळे,गुलाब शेख ,संभाजी घोडके ,अच्यूत घोडके,यांचेसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गावकरी सामाजिक अंतराचे पालन करुन हजर होते.सुत्रसंचालन केशव वायबसे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक मधुकर सिरसट यांनी मानले.
कोरोना लसिकरणाची जणजागृती
या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोलीमाळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ आसाराम चौरे यांनी कोरोना लसिकरणाची सविस्तर माहिती देऊन,नागरिकांची जनजागृती केली.व सर्वांनी लसिकरण करुन घेण्याचे आवाहन केले.
कै. श्रीधर कोकीळ यांच्या स्मरणार्थ होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे माजी विद्यार्थी श्री राम कोकीळ (पुणे) यांनी कै. श्रीधर कोकीळ यांच्या स्मरणार्थ कर्मवीर विद्यालयातील 3 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 हजार 500 रूपया प्रमाणे यावेळी एकुण 3 विद्यार्थ्यांना रूपये 4 हजार 500 रूपयांची शिक्षणासाठी मदत दिली. यापुढे प्रती वर्षी मदत देण्याचे जाहीर केले.

COMMENTS