केज दि २८(प्रतिनिधी)
येथील सरस्वती महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला.
काव्यवाचन, ग्रंथप्रदर्शन,व्याख्यान आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पाटील प्रमुख पाहुणे प्राचार्य एच बी सौदागर, प्राडॉ छत्रभुज सोळंके,प्रा डॉ छत्रभुज सोळंके,प्रा डॉ प्रशांत क्षीरसागर ,मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ सारिका बुरगे,प्रा सीता केंद्रे आदींची होती
विद्यार्थी व उपस्थितांचे काव्यवाचन हा कार्यक्रम पहिल्या दिवशी घेण्यात आला तर दुसऱ्या दिवशी ग्रंथ प्रदर्शनामध्ये विविध विद्यार्थी प्राध्यापक इत्यादींनी सहभाग घेतला.
समारोप कार्यक्रम प्रसंगी बोलतांना डॉ क्षीरसागर यांनी मराठी भाषा संवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.सोळंके मराठी भाषा प्राचीन असल्यामुळे तिचे अस्तित्व कायम टिकून राहणार असल्याचे मत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी तर आभार सीता केंद्रे यांनी मानले मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा दरम्यान विविध उपक्रम घेऊन मराठी भाषा संवर्धन विषयी कार्यक्रम घेण्यात आले

COMMENTS