नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
"डॉ बाबासाहेब आंबेडकरानी प्रत्येक भारतीय नागरीकांना दिलेल्या एका मताच्या आधारेच प्रजेची सत्ता निर्माण झााली युवा नेते दत्तात्रय बालाजीराव पाटील यांचे प्रतिपादन
मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील जिल्हा परिषद हायस्कुल शाळेमध्ये दि 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7ः35 वा 72 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने जि.प.हा शाळेचे मुख्याध्यापक वाय डी बहीरवाड यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व तिरंगा ध्वजाचे ध्वजाररोहन करण्यात आले.यावेळी श्री स्वामी सर,बेजगमवार सर,गायकवड सर,राठोड सर,मठपती सर,चव्हाण सर,परतवाड सर,सुतार सर,बोंतापल्ले सर,आंबेकर सर,पवार सर,मानेकर सर,सह विद्यार्थी ,विद्यार्थीनी व सेवक शेख मामू व कानगुले मामा इत्यादींची उपस्थिती होती तसेच बेटमोगरा ग्राम पंचायत कार्यालयात ही प्रशासक तथा ग्रामविकास अधिकारी श्री के एस स्वामी यांनी प्रथमतः भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व तिरंगा ध्वजाचे ध्वजाररोहन करण्यात आले.यावेळी बेटमोगरा येथील प्रभाग क्रं.1 चे ढाण्या वाघ म्हणून संबोधल्या जाणारे तरुण तडफदार, झुंजार नेतृत्व असणारे युवा नेते दत्तात्रय बालाजी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरानी प्रत्येक भारतीय नागरीकांना दिलेल्या एका मताच्या आधारेच देशात प्रजेची सत्ता निर्माण झााली.म्हणूनच आपण सर्व भारतीय 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या कार्यक्रमाला बेटमोगरा येथील ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचीत सदस्य तथा सिद्धेश्वर ग्रामविकास परिवर्तण पॅनलचे प्रमुख श्री धनराज शिवराज पाटील,दत्तात्रय बालाजीराव पाटील,संदीप शिवराज पाटील,माजी सरपंच खुशाल जी पाटील,मष्णाजी बा-हाळे,दत्ता रामचंद्र पाटील,यशवंत पाटील खपाटे, हणमंत सुवर्णकार,राजेश चिलकावार,प्रल्हाद यरपलवाड,ज्ञानेश्वर तळणे,शंकर खपाटे,सुधकर सुर्यवंशी,बळी नवलेकर सह गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

COMMENTS