नगरपरिषद किल्ले धारूर चे दुर्लक्ष
किल्ले धारूर(वार्ताहर)
शहरामध्ये नगर परिषदेतर्फे मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवले जाते असे सांगितले जाते पण वास्तव्यात शहरासह किल्ले धारूर च्या ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात ढिगअसल्याने प्रवेश द्वारा येणाऱ्या पर्यटकासह नागरिककाचे आरोग्य धोक्यात आले आहे या कडे मात्र नगर परिषदचे दुर्लक्ष करत असलेस दिसत आहे
नगर परिषद चे स्वच्छता अभियान अस्तित्वात आहे का नाही अशी शंका उपस्थित होण्याचे कारण किल्लेधारूर शहरांमध्ये गल्लोगल्ली कचऱ्याचे ढिगारे तुंबलेल्या नाल्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या रस्त्यावर येणाऱ्या पाण्यामुळे रहदारीच्या ठिकाणी वाहतूक करणे देखील अवघड झालेले आहे तसेच किल्ले धारूर ऐतिहासिक ठेवा असलेला महादुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या जवळच कचरा कुंड्यांची मोठ्या प्रमाणात तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व अस्वच्छतेचे पसरले आहे तसेच या किल्ल्याच्या परिसरात प्रातर्विधी साठी जाणारी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे सार्वजनिक ठिकाण च्या शौचालय मध्ये पाणी टाकले जात नाही त्याची देखभाल नगर परिषद कडून केली जात नाही त्यामुळे आम्हाला पर्याय नाही असे या भागातील नागरिक सांगितले
किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी जाण्याचा या दुर्गंधी च्या मार्ग वरून जावे लागत असल्यामुळे पर्यटकही नाराजी व्यक्त करत आहेत स्थानिक प्रशासन म्हणून नगर परिषद च्या वतीने हे स्वच्छता अभियान राबवले जाते ते नावापुरतेच आहे का असा संतप्त सवाल नागरिकांमधून इतिहास प्रेम इकडून आणि पर्यटकांकडून विचारला जात आहे

COMMENTS