मोटारसायकल स्वाराच जळुन जागीच मृत्यू मस्साजोग प्रतिनिधी- केज तालुक्यातील मस्साजोग येथे केज-बीड रोड एक मोटरसायकल व मारुती कार (एम एच-२३ वाय...
 |
मोटारसायकल स्वाराच जळुन जागीच मृत्यू
मस्साजोग प्रतिनिधी- केज तालुक्यातील मस्साजोग येथे केज-बीड रोड एक मोटरसायकल व मारुती कार (एम एच-२३ वाय-०१२१) यांची समोरा समोर धडक होऊन मोटारसायकलने जागीच... पेट घेतला मोटरसायकलस्वाचा जागीच मृत्यू झाला आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. १० जानेवारी रविवार रोजी सायंकाळी ६:०० वा. च्या दरम्यान केज-बीड रोड वरील मस्साजोग पासून सुमारे दीड किमी अंतरावर वरील पेट्रोल पंपाजवळ मोटर सायकल व मारुती कार (एम एच-२३ वाय-०१२१) यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, मोटरसायकल आणि मारुती गाडी यांची धडक होताच मोटरसायकलने पेट घेतला. या अपघातात मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे.या अपघातात मोटरसायकलस्वार परमेश्वर गणेश नरवटे वय २७ वर्ष रा. इस्थळ ता. केज यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
|
COMMENTS