केज प्रतिनिधी :- रात्री ८:३० ची वेळ त्यात केज तालुक्यातील अडवळणी गावात एक सुमारे ४० ते ४५ वर्षाची महिला आलेली. तिची गावकऱ्यांनी चौकशी सुरू केली पण तिला काहीही बोलले तरी ती काहीच उत्तर देत नसल्याने गावकरी परेशान झाले. मग त्या नंतर त्यांना समजले की, ही महिला मूक बधिर आहे. गावातील विमा प्रतिनिधी यांनी केज तालुक्यातील पत्रकारांशी संपर्क साधला. मग पत्रकारांनी तात्काळ पोलीस, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून अवघ्या एक तासाच्या आत त्या महिलेचा तपास काढून तिच्या कटुंबियांशी संपर्क साधला व घरी सुखरूप पोहोचविले. या बद्दल सर्वांचे अभिनंदन केले जात आहे
या बाबतची माहिती अशी की, दि. ५ जानेवारी रोजी केज तालुक्यातील एका अडवळणाच्या तरनळी या गावात रात्री ८:३० वा एक मूकबधिर महिला आली. तिच्याकडे साळेगाव ते केज या एसटी प्रवासाचे तिकीट होते एवढीच अल्प माहिती वरून विमा प्रतिनिधी सुनिल कांबळे यांनी पत्रकार गौतम बचुटे यांच्याशी संपर्क साधला. नंतर गौतम बचुटे यांनी त्या महिलेचा फोटो आणि तिची माहिती केज, धारूर व युसुफवडगाव येथील पोलीस स्टेशला संपर्क साधला. तसेच पोलीस अधिकारी, पत्रकार आणि जागरूक नागरिकांना सोशल मिडियाद्वारे व फोन करून कळविले.
त्या नुसार धारूर पोलीस स्टेशनचे परमेश्वर वखरे, धारूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सुरेखा धस, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे, महिला पोलीस सुनीता समुद्रे, युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे सपोनि विजय आटोळे, खनपटे साहेब, केज पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, श्रीराम काळे, पत्रकार महादेव गायकवाड, पत्रकार डी. डी. बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते बाबा पोटभरे, भैय्या पोटभरे, तलाठी नवले, औरंगाबादच्या वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी ओंकार आव्हाड, अमर लोंढे, साळेगावचे माजी सरपंच सुभाष गालफाडे, बाळू गालफाडे, अजय बचुटे, राम खोडसे, पत्रकार मुजमुले सर, गोविंद टोपे व अनेकांनी तपास करून ही महिला कल्पना अभिमान भोसले असे तिचे नाव असून ती कळंब तालुक्यातील शिराढोण पोलीस स्टेशन हद्दीतील आव्हाड शिरपुरा या गावची असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळविली. नंतर रात्री ९:३० च्या दरम्यान धारूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्या मूकबधिर महिलेला धारूर येथील पोलीस स्टेशनला घेऊन आले.
सपोनि सुरेखा धस व परमेश्वर वखरे यांनी ती मूकबधिर महिला कल्पना भोसले व तिचा मुलगा यांच्याशी पत्रकार गौतम बचुटे यांच्या मोबाईल वरून कॉन्फरन्स प्रणालीद्वारे संपर्क साधला. नंतर तिला शासकीय वाहनाने तिला तिच्या घरात पर्यंत सोडण्याची तयारी केली. मात्र तो पर्यंत त्या महिलेच्या मुलाने ते स्वतः खाजगी वाहनाने धारूरला येत असल्याचे कळविले.
काही वेळा नंतर ती महिला कल्पना अभिमान भोसले हिचे कुटुंबातील सदस्य धारूर पोलीस स्टेशनला हजर झाले. त्यांची सर्वांची ओळख पटवून कल्पना भोसले तिला नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
या घटनेने पोलीस पत्रकार आणि सामाजिक आत्मभान असलेले कार्यकर्ते यांनी केलेल्या परिश्रमाचे कौतुक होत असून त्यांचे समाजातून अभिनंदन होत आहे.
COMMENTS