*विशेष पथकाने केलेल्या कारवाईत ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त*
सोनपेठ/प्रतिनिधी
कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून चक्क खोटे सोने देत फसवणूक करणार्या ३ भामट्यांना जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकासह सोनपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत ताब्यात घेतले आहे.या धाडसी कारवाईत चोरट्यांकडून रोख ४ लाख ४३ हजार रुपयांसह ७३ हजार रुपयांचा चोरीतील मोबाईलही संयुक्त पथकाने जप्त केला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,३ जानेवारी रविवार रोजी सोनपेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीत कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील सागर राठोड यांच्यासह दोघांना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीतील गोविंदवाडी शिवारात रात्रीच्या वेळी बोलावून घेत.रात्रीच्या सुमारास सांगितल्याप्रमाणे सागर राठोड त्याच्या इतर नातेवाईकांना घेऊन बोलावलेल्या ठिकाणी सोने घेण्यासाठी गेले होते.मोठी रक्कम सोबत आणलेल्या सागर राठोड यांच्यासह अन्य दोघांना मारहाण करीत त्यांच्याजवळील ४ लाख ३५ हजार रुपयांसह मोबाईल,१० ग्रॅम सोने घेऊन घेऊन भामट्यांनी पोबारा केला होता.या प्रकरणी सागर राठोड यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिस स्थानकात रितसर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी सोनपेठ पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास भिकाने व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी हे त्या चोरट्यांच्या शोध घेत होते.त्याच दरम्यान हे सोनपेठ तालुक्यातील तांड्यावर असल्याची माहिती सोनपेठ पोलिसांसह पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या पथकास मिळाली होती.सोनपेठ पोलिस व विशेष पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपी मंगल भालू भोसले,रेखा नागनाथ पवार,दीपक बालू भोसले या तीघांना मोठ्या शिताफीने सोनपेठ तालुक्यातील एका तांड्यावरून ताब्यात घेतले.त्यांच्याकडून ४ लाख ३२ हजार रुपये रोख व ७३ हजार रुपयांचा एक मोबाईल असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
COMMENTS