मुखेड अभिवक्ता संघाची नुतन कार्यकारणी जाहीर ॲड. कुंद्राळकर यांची अध्यक्ष पदी तर ॲड.डुमणे यांची सचिव पदी निवड


मुखेड अभिवक्ता संघाची नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. ॲड.शिवराज पाटील कुंद्राळकर यांची अध्यक्ष पदी तर ॲड. गोविंद डुमणे यांची सचिव म्हणून निवड झाली आहे. 

मुखेड अभिवक्ता संघाचे मावळते अध्यक्ष ॲड.एम.बी.कदम, सचिव ॲड.दत्तात्रेय हाक्के यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे.

अध्यक्ष - ॲड.शिवराज पाटील कुंद्राळकर, उपाध्यक्ष - ॲड.गोपाळराव जाधव, सचिव - ॲड. गोविंद डुमणे, सहसचिव - ॲड.आशिष कुलकर्णी, कोषाध्यक्ष - ॲड.लक्ष्मीकांत दुधकवडे यांची निवड करण्यात आली आहे. अभिवक्ता संघाच्या एकुण 61 सदस्यापैकी 42 सदस्यांनी मतदान केले. अध्यक्ष पदासाठी ॲड. कुंद्राळकर यांना 40 मते तर ॲड.उल्हास सोनटक्के यांना 2 मते, उपाध्यक्ष पदासाठी ॲड.गोपाळराव जाधव यांना 40 मते तर ॲड.शारदा पाटील यांना 2 मते, सचिव पदासाठी ॲड. गोविंद डुमणे यांना 41 मते तर ॲड. वाघमारे यांना एक मत, सहसचिव पदासाठी ॲड. आशिष कुलकर्णी यांना 39 मते तर ॲड. सोमवारे यांना 3मते, कोषाध्यक्ष पदासाठी ॲड. दुधकवडे यांना 40 तर 2  

मते मिळाली आहेत. 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. आनंद जोगदंड तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. गजानन देवकत्ते यांनी काम पाहिले आहे. या निवडीचे अनेकांनी अभिनंदन केले खेड अभिवक्ता संघाच


टिप्पण्या