ग्रामपंचायत निवडणुकीला का उभा राहिला म्हणून गळा दाबून जीव मारण्याचा प्रयत्न

दिंद्रुड पोलिसांत गुन्हा नोंद  दिंद्रुड प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दि. 15 रोजी मतदान होते, मतदान प्रक्रिया द...


दिंद्रुड पोलिसांत गुन्हा नोंद

 दिंद्रुड प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दि. 15 रोजी मतदान होते, मतदान प्रक्रिया दिवसभरात शांततेत पार पडली मात्र या शांततेचा भंग होत संध्याकाळी गालबोट लागले. परिवर्तन पॅनल चे वार्ड क्रमांक ३चे उमेदवार अतुल जालिंदर चव्हाण हे मतदान आटोपल्या नंतर घरी आले होते. या प्रसंगी घरातून बाहेर जाण्यासाठी निघाले असता शेजारीच राहणारे रमेश जनार्दन झोडगे,गणेश जनार्दन झोडगे, गौरव उर्फ बंटी गणेश झोडगे, हर्षद गणेश झोडगे, जनार्दन झोडगे यांनी अतुल चव्हाण यांना विचारले की तू ग्रामपंचायतला निवडणुकीला का उभा राहिला? तेव्हा लोकशाही आहे मला अधिकार आहे उभा राहण्याचा असे उत्तर चव्हाण यांनी देताच सर्व आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या हातात असलेल्या काठीने मारहाण करण्यास चालू केले यावेळी रमेश झोडगे यांनी छातीवर बसून गळा दाबून जीव मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दिंद्रुड पोलीस स्टेशनला अतुल चव्हाण यांनी दिली आहे. चव्हाण यांना आरोपींनी हाताच्या कोपराने डोक्यात मारहाण करून मुक्का मार देऊन तोंडावर बुटासह लाथा मारत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार केली आहे. भांडणाची सोडवासोडव करणार्या अनिल महादेव मांयदळे यास हि उपरोक्त आरोपींनी चोप देत तुला जिवे मारून टाकू अशी धमकी दिली,यावेळी आमच्या विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार दिली तर तुला गावात राहू देणार नाहीत अशा धमकी देण्यात आली असे असल्याची फिर्याद अतुल चव्हाण यांनी दिंद्रुड पोलीस स्टेशनला दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून सदरील आरोपींवर भारतीय दंड सहिता 1860 नुसार कलम 143 147 149 294 506 323 नुसार शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार गणेश राठोड करत आहेत. 

घटना घडत असतांना घटनास्थळी मोठा जमाव जमला होता, घटनास्थळी पोलिस कर्मचारी वेळीच पोहोचल्यामुळे जमाव पांगला असुन दिंद्रुड येथे मतदान नसतांना गावाची शांतता भंग करणाऱ्या झोडगे परिवांरावर दिंद्रुड ग्रामस्थांत संताप व्यक्त होत होता.दिंद्रुड पोलिस स्टेशनला ग्रामस्थांनी गराडा घालत आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group