अनंत जाधव /मस्साजोग - केज तालुक्यातील मस्साजोग शिंदी रोडवर एम एच १२आर टी ४५१९ या चारचाकी वाहनाच्या धडकेत एक सायकल स्वार व शेतकरी गंभीर ...
अनंत जाधव /मस्साजोग -
केज तालुक्यातील मस्साजोग शिंदी रोडवर एम एच १२आर टी ४५१९ या चारचाकी वाहनाच्या धडकेत एक सायकल स्वार व शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२२ डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी अकरा साडे अकरा च्या दरम्यान शिंदी रोडवर घडली आहे जखमी प्रतिक विजय गायकवाड वय ४ वर्षे रा.मस्साजोग हा शिंदी रोडच्या बाजूला सायकल वर बसून उभा होता व संतोष ज्ञानोबा गायकवाड वय ३९ वर्षे रा. मस्साजोग हे शिंदी रोडच्या कडेने स्वतःच्या शेताकडे चालत जात असताना या दोघांना चार चाकी वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांच्या वर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत

COMMENTS