जिल्हा प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापुर पोलिस ठाणे म्हणजे जिल्ह्यातील सर्वात मोठे पोलिस ठाणे म्हणुन ओळखल्या जाते ठाण्याचे हद्दीतील वारंगा फाटा येथे 10 डिसेंबर रोजी चोरट्यांनी एकाच रात्री सहा दुकाने फोडून एक लाख रूपायांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेला तब्बल पंधरा दिवस ऊलटूनही चोरीचा तपास लागत नसल्याने आखाडा बाळापुर पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
आखाडा बाळापुर पोलिस ठाण्याचे हद्दीत 83 गावांचा समावेश असुन अनेक मोठमोठ्या गावांचा समावेश आहे. आखाडा बाळापुर हे मोठी बाजारपेठ असल्याने बाजारात आजुबाजुंच्या गावातील नागरीकांची मोठी रेलचेल असते. त्यामुळे बाळापुर पोलिस ठाण्याला एका कर्तबगार अधिकारी यांची गरज आहे. मागील काही महिन्यांपासून ठाण्याचा कारभार बारगळला असुन चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने नागरीकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंधरा दिवसापुर्वी झालेल्या चोरीचा तपास अद्याप लागला नाही तर 21 डिसेंबर ला बाळापुरातील मुख्य बाजारपेठेतील आठ दुकाने फोडून चोरट्यांनी पुन्हा मोठा मुद्देमाल लंपास करीत पोलिसांना एक प्रकारे आवाहन दिले आहे. मात्र नेहमीच सायलेंट मोडवर असणारे ठाणेदार उंडेकर कधी अँक्शन मोडवर येणार यासाठी नागरीकांमधे प्रतिक्षा आहे. तब्बल पंधरा दिवस उलटूनही चोरीचा तपास लागत नसल्याने ठाणेदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. चोरटे सिसिटिव्ही मध्ये कैद होऊन सुद्धा तपास लागत नसेल तर चोरीचा तपास हिंगोली येथील स्थानिक गुन्हा शाखेकडे देण्याची मागणी वारंगा फाटा येथील व्यापाऱ्यांकडून होत असल्याची चर्चा परिसरात रंगु लागली आहे.


COMMENTS