आनंदगाव(सा)येथे रक्तदान शिबीर


केज दि २५(प्रतिनिधी)

तालुक्यातील आनंदगाव (सा)येथे कोरोना संकटामुळे खंडोबा यात्रा रद्द करण्यात आली.सामाजिक उपक्रम बुधवार रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. खंडेश्वर यात्रा महोत्सव, मराठा वारीअर्स ग्रुप आनंदगाव व स्व बाबूरावजी आडसकर महाविद्यालय केज राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर घेण्यात आले.यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच गणेश राऊत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी,प्रा डॉ बिडवे,प्रा डॉ अनिल गायकवाड, प्रा पी बी क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

छबिना मिरवणूक, वाघ्या मुरळी कार्यक्रम, बारा गाडया ओढणे , महाप्रसाद , गोंधळी कार्यक्रम, लोकनाट्य तमाशा ,लंगर तोडणे, रक्तदान शिबिर, जंगी कुस्त्या, रांगोळी, चित्र रंगभरण स्पर्धा ,पशुप्रदर्शन शिबीर ,शेतकरी मेळावा, आदी कार्यक्रम रद्द करून यावर्षी कोविड च्या संकटामुळे सामाजिक उपक्रम रक्तदान शिबीर घेण्यात आले.

शासकीय रक्तपेढी स्व राती ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई चे डॉ नारायण पोळ

,जगदीश रामदासी 

शशिकांत पारखे,

शेख अन्वर,

सुनील सोळंके,आदींनी रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य केले. शिबिरास रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.कोविड ची काळजी घेऊन शिबीर घेण्यात आले.


टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज