केज/प्रतिनिधी:- केज तालुक्यातील सुकळी व गोटेगाव येथील शेतकऱ्यांनी दोन महिन्यापुर्वी राज्यमहामार्ग ६४ मध्ये गेलेल्या आपल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणुन रास्ता रोको केला होता त्यावेळी त्यांना हा रोड शासनाचाच आहे याचे कागदपत्रे एक महिन्यात सादर करण्याचे लेखी आश्वासन दिले होते पण ते आश्वासन हवेतच विरले त्यामुळे येथील शेतकरी रोडसाठी दिलेल्या जमिनीवर येत्या २८ डिसेंबर रोजी ताबा करणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पुर्वी कळंब-अंबाजोगाई हा राज्य मार्ग युसूफवडगाव-सुकळी मार्गे कळंबला जात असे पण मांजरा धरण बांधल्यामुळे हा मार्ग पाण्याखाली गेला त्यामुळे हा मार्ग बदलुन युसूफवडगाव-गोटेगाव-सुकळी असा केला गेला पण त्यावेळी हा मार्ग ज्या शेतकऱ्यांच्या शेतातुन गेला त्यांना आजपर्यंत त्याचा मोबदलाच मिळालेला नाही.मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी दोन महिन्यापुर्वी रास्ता रोको केला होता कारण दिलेल्या जमिनी या अजुनही संबंधित शेतकऱ्यांच्या नावरच असल्याने शासनाने एक प्रकारे यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून रोड तयार केला असे म्हणता येईल कारण या हा ३ किमीचा रोड सा.बां विभाचा आहे याचा खुद्द त्यांच्याकडेच काही शासकीय पुरावा नाहीये हा ३ किमीचा रस्ता शासनाचा आहे आणि त्याचे कागदपत्रे एक महिन्यात सादर करू असे लेखी आश्वासन सा.बा.विभाग केजचे उप अभियंता व्हि एम कांबळे यांनी त्यावेळी शेतकऱ्यांना दिले होते.पण दोन महिन्याचा कालावधी उलटुन गेला तरी शेतकऱ्यांना दिले लेखी आश्वासन पुर्ण केले नाही.त्यामुळे संबंधित शेतकरी आक्रमक झाले असुन रोडसाठी गेलेल्या जमिनीचा एकतर मोबदला द्यावा अथवा हा रोड शासनाच्या मालकीचा याचे पुरावे तरी सा.बां.विभागाने द्यावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे अथवा आम्ही आमच्या जमिनीचा ताबा घेऊन त्या नांगर टाकु यासाठी शेतकरी येत्या २८ डिसेंबरला रोडचा ताबा घेणार आहेत.
शासनाने हा मार्ग बनवण्यासाठी त्यावेळी १८ शेतकऱ्यांची जवळपास ३३० गुंठे म्हणजेच जवळजवळ ८ एक्कर २५ गुंठे जमीन अधिग्रहण करून रस्ता तयार केला पण त्याचा मोबदला या शेतकऱ्यांना दिला गेलाच नाही.म्हणुन या संबंधित शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षापासुन शासनदरबारी खेटे मारण्यास सुरुवात केली पण त्याचा काय फायदा होईना म्हणुन शेतकऱ्यांनी आता हा मार्ग निवडला आहे.
COMMENTS