किल्ले धारूर /प्रतिनिधी
आदर्श पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर येथील आदर्श पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील कावळे कार्याध्यक्षपदी सचिन थोरात उपाध्यक्षपदी नाथा ढगे तर सचिवपदी बालाप्रसाद जाजू यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे
धारूर तालुक्यात गेल्या तिन वर्षांपासून लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी किल्ले धारूर आदर्श पत्रकार संघ सर्वश्रुत आहे, पाणि फाउंडेशन, किल्ला संवर्धन, सामाजिक कार्यात गेल्या तिन वर्षांपासुन या पत्रकार संघाचा मोलाचा वाटा आहे.आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी नव तरूण पत्रकार उत्साही भावनेतून काम करण्यासाठी नविन पदाधिकारींची सर्वानुमते निवड केली आहे.धारूर येथील शासकीय विश्रामगृहात नवनियुक्त पदाधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी आदर्श पत्रकार संघाचे नुतन तालुका अध्यक्ष पदी सुनील कावळे,कार्याध्यक्ष पदी सचिन थोरात,उपाध्यक्ष नाथाभाऊ ढगे, तर सचिव पदी बालाप्रसाद जाजू यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.या बैठकीस पुर्व अध्यक्ष प्रकाश काळे,संदिपान तोंडे,परमेश्वर राऊत, संतोष स्वामी,सूर्यकांत जगताप, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS