सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ येथे शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडुन हमाली घेतली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली त्या तक्रारीची दखल घेऊन शेतकरी संघटनेचे विश्वंभर गोरवे यांनी सहाय्यक निबंधक यांची भेट घेऊन या बाबत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली त्यावरुन सहाय्यक निबंधक यांनी बाजार समिती व खरेदी केंद्रावर सुचना देऊन शेतकऱ्यांच्या कडुन घेण्यात आलेली हमाली शेतकऱ्यांना परत करण्याचे निर्देश देत हमाली न घेण्याच्या सुचना केल्या.यामुळे दि. २४ रोजी सोनपेठ येथील शासकीय खरेदी केंद्रावर कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या कडुन कोणतीही हमाली घेण्यात आली नाही.यामुळे कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी हमाली वसुलीस विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या विश्वंभर गोरवे व सहकाऱ्यांचा सत्कार केला.यावेळी शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव अशोक भोसले,खरेदी केंद्राचे व्यवस्थापक वैभल डगले,श्रीराम वांकर यांचाही सत्कार केला या वेळी गणेश पतंगे,कालीदास मस्के,देवीदास भुजबळ आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय खरेदीसाठी करार करतांनाच कापसाची हमालीही संबधीत यंत्रणेने द्यावी असे स्पष्ट निर्देश असतांना पहिल्याच दिवशी ही हमाली शेतकऱ्यांकडुन कशी काय वसुल करण्यात आली असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

COMMENTS