माजलगाव (प्रतिनिधी)
बँकिंग क्षेत्रात कार्यरत मराठवाड्यातील अग्रगण्य असणाऱ्या श्री मंगलनाथ मल्टिस्टेटच्या वार्षिक कॅलेंडर सन २०२१ चे प्रकाशन प. पू. तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्या शुभ हस्ते दि.२२/१२/२०२० रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले, या प्रसंगी माजलगावकर महाराज यांनी संस्थेच्या आर्थिक व सामाजिक कार्याबद्दल कौतुक करत दर्जेदार दिनदर्शिका सभासदांना उपलब्ध करून दिली आणि माजलगावचे आराध्य दैवत श्री मंगलनाथ देवस्थान उत्सव, विवाह व वास्तू मुहूर्त यांची विशेष नोंद घेतल्याचे सांगितले, तसेच यावेळी उपस्थित अध्यक्ष श्री आर. जी. कानडे यांनी या दिनदर्शिकेमध्ये संस्थेच्या विविध ठेव आणि कर्ज योजना, उपलब्ध सुविधा, सोने तारण कर्ज, वेअर हाऊस कर्ज, ATM सुविधा, याबाबत खातेदार सभासदांना माहिती देण्यात आलेली असून दर्जेदार व आकर्षक दिनदर्शिका छपाई केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी संचालक श्री. सुधाकर गुळवे, सीईओ श्री रवींद्र कानडे, महाव्यवस्थापक श्री घुसे लिंगराज, व्यवस्थापक श्री कुलकर्णी सत्यविजय, श्री. कैलासे सचिन, श्री. रूपेश पांचाळ हे उपस्थित होते.

COMMENTS