परभणी(क्रीडा प्रतिनिधी) दिनांक २५ डिसेंबर : औरंगाबाद येथील स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (साई) सेंटरमध्ये केंद्र शासनाच्या वतीने तलवारबाजी, बॉक्सिंग, हॉकी आणि जलतरण या चार खेळांसाठी अद्यावत सेंटर उभारणीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातील असे भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजूजी यांनी या प्रंसगी म्हणाले. दिनांक २४ डिसेम्बर रोजी त्यांनी औरंगाबादच्या साई सेंटरला भेट दिली आणि त्यांच्या हस्ते या चार खेळासाठी तयार करण्यात येणाऱ्या सुविधांचा कोनशिलाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्याचे क्रीडा क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. यामध्ये औरंगाबादचाही मोलाचा वाटा आहे. येथे खेळाच्या दृष्टीने आवश्यक वातावरण आहे, येथील मुलांमध्ये चांगले टॅलेंट आहे. प्रशिक्षक आहेत आणि क्रीडा संघटकांचे मोलाचे योगदान आहे. आणि खेळाच्या विकासासाठी येथील स्थानिक संस्थांनी आधीच क्रीडांगण आणि इतर सुविधा सरकारच्या मदतीआधीच दिल्या आहेत हे फार महत्वाचे योगदान आहे.
त्यामुळेच येथील साई सेंटरमध्ये भारत सरकारच्या वतीने आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील असे सांगितले.
यामध्ये जलतरणसाठी ९. ९ कोटी, तलवारबाजीसाठी (Fencing) ४. ५० कोटी, हॉकीच्या टर्फ कोर्टसाठी ४. ८४ कोटी, आणि येथे ३०० बेडच्या हॉस्टेल साठी २८ कोटी अश्या प्रकारे केंद्र शासनाच्या वतीने निधी देण्यात येणार आहे. तर साहित्यासाठी ५ कोटी रुपये लगेचच वर्ग करण्यात येत आहे असे सांगितले. तसेच येथील साई सेंटरचे संचालक, डॉ. वीरेंद्र भांडारकर,आणि खेळांचे प्रशिक्षक चांगली मेहनत घेत आहेत हे सांगितले. त्यामुळेच मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे या औरंगाबादच्या साई सेंटरच्या खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची चांगली संधी मिळेल आणि यापैकी किमान २०-२५ खेळाडू नक्कीच पुढील सन २०२४ आणि २०२८ च्या ऑलीम्पिकमध्ये सहभाग आणि प्रावीण्य मिळवितील असे सांगितले.
यावेळी येथील खासदार डॉ. भागवत कराड, इम्तियाज जलील,बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि स्थानिक संघटक यांच्या वतीने ऍथलेटिकससाठी सिन्थेटिक ट्रॅक,जिमन्यास्टिक्ससाठी आणि आणखी काही इतर खेळासाठी आणखी सुविधा मिळाव्या, तसेच या ठिकाणी खेळाच्या सर्व सुविधा आहेत त्यामुळे येथे एन. आय.एस.चे सेंटर मिळावे यासाठी मागणी केली. यावर उत्तर देतांना क्रीडा मंत्री किरण रीजुजी यांनी सांगितले की या सर्व बाबींवर सखोल विचार करून याचा आढावा घेऊन नक्कीच या सर्व सुविधा येथे दिल्या जातील असे सांगितले.
यावेळी टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आनंद खरे आणि टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएकशनचे सरचिटणीस आणि भारतीय
टेनिस व्हॉलीबॉल फेडेरेशनचे सदस्य गणेश माळवे, पदाधीकारी अशोक दुधारे यांनी क्रीडा मंत्री किरण रिजूजी यांची भेट घेऊन त्यांना टेनिस व्हॉलीबॉल या खेळाच्या २२ वर्षाच्या वाटचालीची माहिती दिली आणि वार्षिक अहवाल सादर केला.
![]() |
फोटो :- 1) केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजूजी यांना अहवाल सादर करतांना आनंद खरे, गणेश माळवे, अशोक दुधारे, डॉ. उदय डोंगरे आणि इतर |
2) केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजूजी यांना सन्मानचिन्ह प्रदान करतांना, खा.डॉ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, अशोक दुधारे, डॉ. उदय डोंगरे, आनंद खरे, गणेश माळवे, आणि इतर


COMMENTS