आज दिनांक 25/ 12/ 2020 रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने मा.आ.बालाजीराव कल्याणकर साहेबांची भेट घेऊन जूनी पेन्शन लागू करण्यासाठी विधानसभेत आवाज उठविण्यासाठी व पेन्शन मिळण्यासाठी विधीमंडळात पाठपुरावा करण्यासबंधाने निवेदन देऊन पेन्शन प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी साहेबांनी कर्मचारी हा देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा कणा असुन. त्यांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. पेन्शन मिळणे हा कर्मचारी यांचा हक्क असून याविषयी वेळोवेळी विधानसभेत आवाज उठवून पाठपुरावा करणार व जुनी पेन्शन लागू होईपर्यंत मी व माझा पक्ष कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहील. असे आश्वासन मा.आमदार साहेबांनी दिले. दिलेल्या निवेदनाची लगेच दखल घेऊन *मा.बालाजीराव कल्याणकर साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब , महाराष्ट्र राज्याचे वित्तमंञी मा.अजितदादा पवार साहेब* यांना पञ लिहून मी या प्रश्नामध्ये व्यक्तीगत स्तरारुन लक्ष घालीन असे उपस्थित शिष्ठमंडळास आश्वासन दिले.
तसेच DCPS धारकांच्या जिल्हास्तरीय प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली याबाबतीत कोणतीही अडचण आल्यास मला संपर्क करावा असे आश्वासन दिले. यासबंधाने आरोग्य विभागातील समस्यांबाबतीत अधिकाऱ्यांना लगेच फोन करून समस्या सोडविण्याची ताकितही दिली. मा.आमदार महोदयांनी पेन्शन प्रश्नाबद्दल सकारात्मकता दाखविल्याबद्दल साहेबांचे संघटणेच्या वतीने मनापासून धन्यवाद....
*यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संदिप मस्के, जिल्हाउपाध्यक्ष आरोग्य विभागाचे पुष्पराज राठोड, जिल्हा सल्हागार ग्रामसेवक शिवकुमार देशमुख, सहसचिव किशोर नरवाडे, जिल्हा प्रतिनीधी संजय कलेपवार, तालुकाध्यक्ष गोविंद उचले, ऋषिकेश ढाके, श्री जगताप सर, परमेश्वर जाधव, खाडे सर, चैतन्य पिंपळडोहकर, गणपत मुंडकर, गुलाबराव वडजे, गजानन लिंगायत, डिंगने सर यांच्या असंख्य DCPS धारक बांधव उपस्थित होते* या सर्वांची उपस्थिती होती. सर्व उपस्थितांचे संघटणेच्या वतिने अभिनंदन
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन*
*जिल्हा शाखा - नांदेड*
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

COMMENTS