प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आ.बोर्डीकर यांचे उपोषण स्थगित*

* परभणी/प्रतिनिधी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार मेघना बोर्डीकर यांनी सोमवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी दुसऱ्या जिल्हाध...

*


परभणी/प्रतिनिधी


शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार मेघना बोर्डीकर यांनी सोमवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी दुसऱ्या जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सायंकाळी स्थगीत करण्यात आल्याची माहिती आ.बोर्डीकर यांनी अनलयझेरशी बोलताना दिली.


यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे,माजी आमदार मोहन फड,माजी आ.रामराव वडकुते,भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे,ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,बाळासाहेब जाधव,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर,अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,भाजपचे प्रमोद वाकोडकर,शशिकांत देशपांडे,संजय रिझवाणी,मंगल मुदगलकर,डॉ.विद्या चौधरी,विठ्ठलराव रबदडे,सुप्रिया कुलकर्णी,अभय चाटे यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आमदार बोर्डीकर यांना दिलेल्या लेखीपत्रात शासन निकषानुसार काही बधीत शेतकरी राहिले असल्यास अशा शेतकर्‍यांची चौकशी करून त्यांना शासनाच्या निर्णयानुसार मदत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल,२०१८-१९ मधील कोरड्या दुष्काळाबाबत शासनाकडे ११२ कोटी ६७ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असल्याने त्याबाबतही पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद केले आहे.पीकविम्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल,शेतकरी पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने बुधवारी दिनांक चार रोजी आयोजित केलेल्या बैठकीतून आढावा घेतला जाईल व वंचित शेतकर्‍यांना नियमानुसार पीककर्ज वाटपाबाबत कारवाई केली जाईल,असेही नमूद करण्यात आले आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group