कैलास कुंभार यांची अकाली निधन अचानक एक्झिट तिव्र वेदनादायी           - श्रद्धांजली सभेतील भावना 

  माजलगाव/प्रतिनिधी               म.ज्यो.फुले माध्यमिक विद्यालय माजलगाव येथील  विज्ञान शाखेचे उच्च विद्याविभूषित , शांत , संयमी ,स्वभावाचे, ...


  माजलगाव/प्रतिनिधी 


             म.ज्यो.फुले माध्यमिक विद्यालय माजलगाव येथील 


विज्ञान शाखेचे उच्च विद्याविभूषित , शांत , संयमी ,स्वभावाचे, उमदे व्यक्तीमत्व , सा-यांचेच मित्र असणारे माझे सहकारी कैलास जगन्नाथराव कुंभार यांचे असे अकाली ,अचानक निघुन जाणे मनाला तिव्रवेदनादायी करणारेच. काल दूपार पासुन अस्वस्थता व बेचैनी आहे. विद्यालयाच्या परिसरातील झाडांची शास्त्रीय ओळख विद्यार्थ्यांना व्हावी , (वर्गीकरणाचे फलक) त्यासाठी त्यांनी लावलेले फलक आज का कोणास ठाउक उदास वाटत आहेत.


प्रतिवर्षी ओझोनदिनाचे नेटके आणि न चुकता आयोजन करणारे, 


प्रश्नमंजुषा आयोजनात अग्रेसर असणारे , विज्ञानशिक्षक कुंभार यांनी विद्यालयाचा विज्ञान प्रदर्शनातील सहभाग राज्यपातळीवर नोंदविला आहे.


कमी बोलणे हा त्यांचा स्थायीभाव होता. 


अतिशय नम्र व्यक्तीमत्वाचा सहकारी गमावल्याचे दुःख आहे.


अगदी परवा परवा पर्यंत सतत कार्यमग्न असणारे कुंभार यांना अल्प आजाराच्या चोरपावली आलेल्या क्रुर नियतीने आपल्यातुन हिरावुन नेले यावर विश्वासच बसत नाही. 


कैलास कुंभार सर खुप घाई केलीत जाण्याची..


विद्यालयातील विज्ञान दृष्टी रूजवण्याची पोकळी कशी भरुन काढावी ?


....अशा शब्दात प्रभाकर साळेगावकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.


 


निगर्वी व्यक्तीमत्व असणा-या कैलास कुंभार यांच्या विषयी माजी मुख्याध्यापक श्री संतोष मुळी प्राथमिक विद्यालयाचे मुअ श्री प्रदीप भिलेगावकर , व्ही.एन.कुलकर्णी , संतोष जोशी , सुधीर देशमुख , गणेश राठौर , ओम दायमा , अर्जुन शेरकर सौ.मनिषा पाटील , प्रतिभा कांचले , प्रविण काळे यांनी भावना व्यक्त केल्या .


संस्थेचे अध्यक्ष अँड एस.आर.शर्मा , कार्यवाह माजीशिक्षक आमदार डी.के.देशमुख ,र.ब देशमुख , अँड.भिलेगावकर , अँड. मोगरेकर यांचा शोकसंदेश मु.अ.प्रभाकर साळेगावकर यांनी व्यक्त केला.


कुंभार कुटुंबियांना हा आघात सहन करण्याचे बळ मिळावे.


सुमंत गायकवाड धोंडीराम रामुळे , शिवणकर , सुनिता कदम ,माधव कर्णे ,रमेश गिरी यांच्यासह


सर्व सहका-यांनी उभेराहुन 


भावपूर्ण श्रद्धांजली.वाहीली.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group