नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव नगरपंचायत निवडणुकीचा अवधी समीप येत असून प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. नुकतेच प्रभारी मुख्याधिकारी नंदकुमार भोसीकर यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद येथे नगरपंचायतीच्या प्रभाग रचना आणि सदस्य निश्चितीबाबत भेट दिली होती. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये संपणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
नायगांव ग्रामपंचायतीचे २०१५ मध्ये नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर पहिली निवडणूक झाली अनेक दिग्गज निवडणुकीसाठी तयार होते. परंतु आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड झाला. आता दिवाळीनंतर नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार असून इच्छुक तयारीला लागले आहेत. काही दिग्गज आपल्यालाच तिकीट मिळेल या भरवशावर कामाला लागले आहेत.
इच्छुक सण-उत्सवात आपापल्यापरीने शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत.
दरम्यान राज्य निवडणूक अयोगाने २९ ऑक्टोबर रोजी शहरातील नगरपंचायत प्रभाग
हरकती व सूचना मागविणे आणि १५ डिसेंबर पर्यंत हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे, १८ डिसेंबर रोजी हरकती सूचना अनुषंगाने विभागीय आयुक्त आणि नगरपंचायत प्रशासनाचे अभिप्राय देऊन अहवाल पाठविणे, २४ डिसेंबर रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे, असा कार्यक्रम निश्चित केला आहे.
३० डिसेंबर पर्यंत प्रभाग निहाय एकून लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या तसेच आरक्षणासह अधिनियमातील कलम १० नुसार अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपंचायत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग चालू असल्याने केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांचे तंतोतंत पालन करुन नमूद नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२० राबविताना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत, अशी माहिती प्रभारी मुख्याधिकारी नंदकुमार भोसिकर यांनी दिली.
नायगांव नगरपंचायतीच्या रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे.त्यांनुसार ११ नोव्हेंबर रोजी प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरपंचायत प्रभागाची संख्या, लोकसंख्या क्षेत्र, आरक्षण यांची माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे सादर करणे, दि, २० नोव्हेंबर पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे, दि.२४ नोव्हेंबर रोजी सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीकरीता नोटीस प्रसिद्ध करणे, २७ नोव्हेंबर रोजी नगरपंचायत सदस्य पदासाठी आरक्षण सोडत काढणे, २ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२० पर्यंत प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्य पदाच्या आरक्षणाची ( अधिसूचना कलम १० नुसार) आमलबजावणी असा आहे.
COMMENTS