राम दातीर
माहूर (प्रतिनिधी ) कोरोना महामारीच्या काळात शासनाने टाळेबंदी घोषीत केल्याने सर्वच व्यवहार पूर्णतः ठप्प झाले होते.त्याचा विपरीत परिणाम टेन्ट मालक व कामगार यांच्यावर झाला असून कुठलेही काम हाती नसल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आल्याचे वास्तव शासनाला पटवून देण्यासाठी टेंट हाऊस असोसिएशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन करण्यात आले .त्याच अनुषंगाने तालुका संघटनेने माहूर तहसील कार्यालयाचे प्रांगणात दि.2 नोव्हें.रोजी 11 ते 5 वाजे पर्यंत धरणे आंदोलन करून नायाब तहसीलदार व्ही.टी.गोविंदवार यांना मागण्याचे निवेदन दिले.
टेंट हाऊस असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप लॉन, मंगल कार्यालयासह हॉल मध्ये क्षमतेपेक्षा अर्ध्या लोकांची व्यवस्था करण्याची परवानगी द्या. मंडप, केटरिंग, मंगल कार्यालय, बॅकवेट हॉल, डिजे साऊंड, लाईट डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापन आणि व्यवसायाशी संबंधित सर्व व्यवसाय धारकांनी घेतलेल्या कर्जावर सबसिडीची तरतूद करा या मागणी सह आदि मागण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष अडेलू कन्नेवाड, उपाध्यक्ष विठ्ठल परसराम चव्हाण, सचिव बादल नारायण राठोड, सदस्य गणेश राठोड, इंद्रसिंग पवार, शेख मुजाहिद, गणेश पवार, दुलसींग चव्हाण, बळीराम राठोड, हरी राठोड, दत्ता दूमपलवार, विनोद चव्हाण, विजय पवार, अर्जुन राठोड, गजानन दुधे, सचिन राठोड, विशाल पाटील, सय्यद लाल सय्यद इस्माईल, उत्तम चव्हाण, जाफरखान दुल्लेखा पठाण, अनिल कोगुरवार, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
COMMENTS