परभणी/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील लासीना येथे उपक्रमशील शेतकऱ्यांच्या बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकारीता बोर्डाचे सदस्य गंगाधर(दादा)पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल हे होते.या यावेळी ॲड.रमेशराव गोळेगावकर,प्रा.रवीकिरण गंभीरे,माजी नगराध्यक्ष बालाप्रसाद मुंदडा,भाजपचे जेष्ठ नेते रमाकांत जहागीरदार,तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गणेश हांडे,सहाय्यक तालुका कृषी अधिकारी समीर वाळके,शेतकरी संघटनेचे नेते सुधीर बिंदू आदींची उपस्थिती होती.यावेळी पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडणे गरजेचे असून सध्या शेतकऱ्यांनी आपले जीवनमान सुधरवण्यासाठी बांबू लागवड करावी असे मत व्यक्त केले.यावेळी पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की,मराठवाड्याची जीवनवाहीनी गोदावरी आहे.पूर्वीच्या काळी याच गोदकाठच्या कडेला झाडाचे जंगल होते.मात्र हे झाडाचे जंगल पाकिस्तानच्या मुस्लिमांनी तोडले का?असा सवाल उपस्थित करत माणूसच माणसाचा हीतशत्रू ठरत असल्याचे स्पष्ट केले.पृथ्वीवर माणूस जिवंत राहण्याची शक्यता नसल्याचा सर्वात मोठा धोका असल्याचे धक्कादायक मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.२०१६ मध्ये पॅरिस येथे सर्व पंतप्रधान यांची प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी बैठक झाली होती.तेथेही ही बाब मान्य करण्यात आली म्हणूनच प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी वाहनाचे इंजिन,विद्युत पुरवठा हा सौर ऊर्जेचा वापर करून केला पाहीजे.यामुळे पर्यावरण रक्षण होईल असे ठरल्याचे त्यांनी सांगितले.पूर्वी पर्यावरण रक्षण होत असल्याने १०० दिवस पाऊस व्हायचा आज पर्यावरण रक्षण होत नसल्याने एक तर ढगफुटी नाहीतर कोरडउठी असा प्रकार निर्माण होत असल्याचे दिसते.लोकसंख्या वाढली जमिनीचे तूकडे झाले पण झाड लावण्यासाठी कोणी तयार होईना हा प्रकार निसर्गाच्या विरोधी असल्यानेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे.यामुळेच कोरोनासारखा महाभयंकर रोग निर्माण झाला आहे.त्यामुळे बांबूसंवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण बांबू लागवडीमूळे वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.भविष्यात प्लास्टिक वस्तू बंद होणार आहेत.बांबूपासून तयार होणाऱ्या १८०० वस्तू वापरल्या जाणार असल्यामुळे बांबू शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास निश्चित मदत करेल बांबू वर्षाला ३०० किलो ऑक्सिजन फेकते.तर कार्बनडाय ऑक्साईड आत घेते.त्यामुळे ऑक्सिजन तयार होऊन आर्थिक उन्नतीसाठी बाबू हेच शेतकऱ्यांना आगामी काळात वरदान ठरणार आहे.
*यावेळी परिसरातील रस्त्याविना त्रस्त असणाऱ्या ग्रामस्थांनी सदर रस्त्यासाठी केंद्रात भाजपचे सरकार असून प्रयत्न करण्याची मागणी पटेल यांच्याकडे करताच सरकार कोणाचेही असो या गावाला रस्ता देण्यासाठी प्रयत्नशील असून पुढील वर्षांपर्यंत रस्ता होणारच असे स्पष्ट अभिवचन दिले.*
COMMENTS