नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) येथील साहित्यिक तथा पत्रकार शंकर बोईनवाड यांच्या ' कोल्हेवाडीचा बाजार 'या त्यांच्या दुसऱ्...
नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) येथील साहित्यिक तथा पत्रकार शंकर बोईनवाड यांच्या ' कोल्हेवाडीचा बाजार 'या त्यांच्या दुसऱ्या बालकविता संग्रहाचे प्रकाशन रविवार दि.1 नोव्हेंबर 2020 रोजी लातूर येथील कै चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न होत आहे
चला कवितेच्या बनात या साहित्यिक व शैक्षणिक चळवळीच्या वतीने संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अविनाश मोरे हे राहणार असून श्री संजीव सोनवणे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
याप्रसंगी कवी संजय घाडगे , समीक्षक किशन उगले यांची उपस्तिथी राहणार आहे .
COMMENTS