जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची मागणी यांची मागणी.
नांदेड प्रतिनिधी 1 नोव्हेंबर
नांदेड जिल्ह्यातील काही व्यापारी नामांकित कांदा बियाण्याच्या काळाबाजार करत असून बियाण्याची कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांना अवाच्या सव्वा दराने कांदा बियाणे विक्री करत असून याकडे कृषी विभागाने तात्काळ लक्ष देऊन या व्यापाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिला आहे.
यावर्षी सरासरीपेक्षा कांद्याला भाव बाजारात चांगले मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे आपला कल वाढला आहे परंतु नांदेड शहरातील अनेक व्यापारी नामांकित कांदा बियाण्यांचा काळाबाजार करून शेतकऱ्याला अव्वाच्या सव्वा दराने कांदा बियाणे विकत आहेत,अनेक शेतकऱ्यांना त्यांनी मागितलेले कांद्याचे बियाणे उपलब्ध नाही असे सांगून दुकानातून परत पाठवत आहेत, कांदा बियाण्याच्या किमतीमध्ये अचानकपणे दुपटीने वाढ झाली आहे या सर्व प्रकाराकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी तात्काळ लक्ष घालून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये बियाणी मिळावे बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये यासाठी काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा कृषी विभागाच्या व कांदा बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेने दिला आहे.
यावेळी निवेदनावर प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर,प्रदेश सल्लागार विजयराव चव्हाण,जिल्हा अध्यक्ष प्रशांत आबादार,ज्ञानोबा गायकवाड पांडुरंग पाटील पोपले,मोतीराम पवार संदीप पावडे, विनीत पाटील, शेख रहीम,शेख अकबर,विजय पाटील शिंदे, विलास माने अविनाश कदम भगवान कदम,विक्रम क्षिरसागर, पवन सूर्यवंशी, सतिष चव्हाण पिंटू पाटील गाढे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
COMMENTS