माजलगाव/प्रतिनिधी
माजलगाव चे नूतन नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी माजलगाव कराच्या डोळ्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली शुद्ध धूळफेक सुरू केली असून माजलगाव व 11 गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टर ची वर्क ऑर्डरच अजून निघाली नाही तर शुद्ध पाणी कसे येणार असा प्रश्न चर्चिला जात आहे.
पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे लिकेज (पाणी गळती) व वॉल काढण्याची वर्क ऑर्डर सौ सुमनताई मुंडे यांच्याच काळात निघाली असल्याचे आ प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या लेटरपड वर 9 नोव्हेंबर रोजी छापून दिले होते.तरी स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात माहीर असलेल्या राष्ट्रवादी चे नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी सौ मुंडे यांच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी लिकेज चे काम चालू असताना फिल्टर चे काम चालू असल्याचे सांगत माजलगावकरा च्या डोळ्यात शुद्ध धूळफेक चालवली आहे. वसंतराव देशमुख अंबाजोगाई यांना लिकेज व वॉल दुरुस्ती चे काम सौ सुमनताई मुंडे यांच्या काळात मिळाले असून त्यांनी हे काम कालपासून सुरू केले आहे.याचे श्रेय सौ सुमनताई मुंडे यांचे म्हणजे भाजप चे आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस चे नगराध्यक्ष आयत्या पिठावर रेघोट्या ओढत असल्याची चर्चा माजलगाव च्या नाक्या नाक्यावर आहे.
नगराध्यक्ष साहेब,लिकेज काढल्यावर पाणी शुद्ध येत नसते;गळती थांबत असते
केवळ कागदी घोडे नाचवण्यात माहीर असलेल्या नगराध्यक्ष ना लिकेज काढण्याची ऑर्डर असल्यावर फिल्टर चे काम कसे करतील हे कोणी तरी सांगा रे म्हणत जनतेने डोक्याला हात लावला आहे. तर लिकेज चे काम केल्यावर पाणी गळती थांबत असते शुद्ध पाणी येत नसते एवढे ही नगराध्यक्ष मंजूर यांना कळत नसेल तर आ सोळंके यांना कपाळ वर हात मारण्याशिवाय पर्याय नाही.

COMMENTS