नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
आमदार बच्चू कडू प्रणित
प्रहार जनशक्ती पक्षाच्या दिव्यांग आघाडीच्या मुखेड शहराध्यक्षपदी संजय कांबळे यांची तर महिला आघाडी अध्यक्षपदी पदमीनबाई कांबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने औरंगाबाद विभागाचे शिक्षक पदवीधर मतदार संघाचे प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार प्राध्यापक सचिन ढवळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतच निवडणूक संदर्भात मुखेड येथे पक्षाची आढावा बैठक पार पडली असून या बैठकीत प्रहारच्या मुखेड शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तालुकाप्रमुख शंकर वडेवार यांच्या हस्ते मुखेड शहराचे सामाजिक कार्यकर्ते तथा धडाडीचे पत्रकार संजय कांबळे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या दिव्यांग आघाडी मुखेड शहराध्यक्षपदी संजय कांबळे यांची निवड करण्यात आली असून या कार्यक्रमाला अनेक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
भारतीय संविधानावर विश्वास ठेवून समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि भारताचे प्रभुत्व राजकीय तसेच सर्वांगीण विकासासाठी आपण प्रहार जनशक्ती पक्षाच्या दिव्यांग आघाडी काम करण्याचे ठरविले असे प्रतिक्रिया नवनियुक्त दिव्यांग आघाडीचे शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी दिले आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मुखेड शहरातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन पद्मीनबाई कांबळे यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
यांच्या निवडीबद्दल विशेष आभार पत्रकार विठ्ठल पाटील येवतीकर, पत्रकार विजय बनसोडे, पत्रकार आदी बनसोडे,बबूल शेख पत्रकार,अशीष कुलकर्णी पत्रकार, यांनी आभार मानले आहे.

COMMENTS