नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतिने जिल्हा परिषदेचे सिईओ सौ. वर्षा ठाकुर यांचा नुकताच ता...
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतिने जिल्हा परिषदेचे सिईओ सौ. वर्षा ठाकुर यांचा नुकताच तालुकाध्यक्ष टी. जी. पाटील रातोळीकर यांच्या नेतृत्वाखाली सत्कार करून प्रथम दौऱ्यानिमीत्त स्वागत करण्यात आले.
नांदेड जिल्हा परिषदेच्या सिईओ सौ. वर्षा ठाकूर यांनी नुकताच नायगांव तालुका दौरा केला. तालुक्यात ग्रामसेवक युनियनच्या पुढाकाराने विविध लोकोपयोगी उपक्रम नेहमीच राबविण्यात येतात. कोरोना काळात उल्लेखनिय कार्य करताना तालुकाध्यक्ष टी. जी. पाटील रातोळीकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला मिळालेला प्रतिसाद उत्सफुर्त होता.
नुकत्याच तालुका भेटीवर आलेल्या सिईओ वर्षा ठाकुर यांच्या सत्कार सन्मान प्रसंगी ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष टी. जी. पाटील रातोळीकर यांच्यासह पदाधिकारी , वरिष्ठ अधिकारी , व ग्रामसेवक यांची उपस्थिीती होती.

COMMENTS