संतोष स्वामी। दिंद्रुड
बीड तालुक्यातील कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रतिवर्षी मोठी यात्रा भरत असते, महाराष्ट्रातील भाविक भक्त या यात्रेसाठी कपिलधारच्या मन्मथ स्वामी माऊलींच्या दर्शनासाठी लाखाेंच्या संख्येने कपिलधार येथे जमा होतात परंतु यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी तिर्थक्षेत्र कपिलधार येथे न येता आपआपल्या घरीच श्री मन्मथ माऊलींच्या प्रतिमेचे पुजन करावे,घरीच भजन करत माऊलींचे स्मरण करण्याचे अवाहन महाराष्ट्रातील नामवंत मठाधिपती श्री श्री १०८ सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा कर यांनी केले आहे.
गेल्या एक वर्षापासून वैश्विक महामारी कोरोनाच्या रुपात पृथ्वीतलावर पसरली आहे, देशासह जगातील जनता या महामारीमुळे अडचणीत आली आहे. या पुढील काही काळ काळजी घेतल्यास या महामारी पासुन आपन सहीसलामत बाहेर पडू त्या करिता शासनाने दिलेले निर्देश पाळा, गर्दीत जाणे टाळा, मास्कचे वापर करा आदी सुचना सिध्दलिंग शिवाचार्य महाराजांनी महाराष्ट्रातील भाविक भक्त शिष्य मंडळींना दिल्या आहेत.
COMMENTS