केज प्रतिनिधी:- केज येथे जनविकास समाजीक संस्थेच्या कौटुंबिक हिंसाचार व महिला समुपदेशन केंद्रात संविधान दिन साजरा करण्यात आला. केज येथे रमेश ...
केज प्रतिनिधी:- केज येथे जनविकास समाजीक संस्थेच्या कौटुंबिक हिंसाचार व महिला समुपदेशन केंद्रात संविधान दिन साजरा करण्यात आला.
केज येथे रमेश भिसे यांच्या जनविकास सामाजिक संस्थेचे कौटुंबिक हिंसाचार आणि महिला यांच्यासाठी चालविण्यात येत असलेल्या समुपदेशन केंद्रात समुपदेशिका जनाबाई खाडे व संकेत काटे यांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पत्रकार संतोष गालफाडे व पत्रकार गौतम बचुटे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस आणि समुपदेशनासाठी आलेल्या तक्रादार महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून व त्यांना अभिवादन करून संविधान दिन साजरा केला.

COMMENTS