माजलगाव प्रतिनिधी
माजलगाव तालुक्यात यावर्षी प्रचंड प्रमाणात उसाचे पीक आलेले असून जास्तीच्या पावसामुळे उसाला एकरीसत्तर टनापर्यंत उत्पन्न होत असून माजलगाव तालुक्यातील सर्वाधिक उसाचे गाळप करणारा कारखाना म्हणून ओळखला जाणारा एन एस एल शुगर, जय महेश पवारवाडी हा कारखाना यावर्षी सुरुवातीपासूनच गेट केन उसाची आयात जास्त प्रमाणात करताना दिसत असताना कारखान्याच्या 15 किलो मीटर कार्यक्षेत्रातील अनेक गावांना एकही बैलगाडी ट्रक ट्रॅक्टर नसल्याचे माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी जय महेश शुगर कारखान्याच्या प्रशासनाकडे, अधिकार्याकडे वारंवार विनंती करून बाहेरच्या शेतक-यांचा ऊस कार्यक्षेत्रातील ऊस पुर्ण गाळप झाल्यानंतरच गेट केन ऊसाला प्राधान्य द्यावे अशी मागणी केली परंतु निगरगट्ट प्रशासन कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून यावर्षी गाळप सुरू करून एक महिना ओलांडला असला तरी अद्याप ऊसाची रीकव्हरी कारखान्याने जाहीर केलेली नाही तसेच एक महिना ओलांडला असूनही उसाचे बिल अद्याप काढलेले नाही शासनाने गाळप केलेल्या उसाचे गाळप केल्यापासून 14 दिवसाचे आत बिल देण्याचे आदेशित केले असताना देखील हे जयमहेश कारखान्यातील प्रशासन शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे परभणी जिल्ह्यात कारखान्याचे वाहने व टोळ्या असून कार्यक्षेत्रात केवळ दोनशे बैल गाडी वरच शेतकऱ्याचे बोळवण कारखाना करत असल्याने तहसील कार्यालय माजलगाव, उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव, कारखाना प्रशासनयांना निवेदन देऊन दिनांक 25 11 2020 पर्यंत कार्यक्षेत्रा बाहेरील पूर्ण वाहने कार्यक्षेत्रात आणून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ऊसाची गाळप झाल्यानंतरच गेट केन उसाला प्राधान्य देण्यात यावे,
एफ आर पी जाहीर करून 14 दिवस उसाची दिले आदा करा, कारखान्यात रोजंदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस व पगार वाढ भत्ता द्या, दहा वर्षापूर्वी पासून कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिनांक 25 अकरा 2020 रोजी पासून बेमुदत गीत कीं चाउस जाणारे वाहन बंद करण्यात येणार असल्याचे भाई अॅड. नारायण गोले पाटील यांनी सांगितले सदर निवेदनावर भाई अॅड. नारायण गोले पाटील,
भाई भगीरथ शेजुळ, राजेभाऊ घोडके, संभाजी चव्हाण,गोळेकर नाना श्रीपाद जाधव ,लहू सोळंके सिद्धेश्वर गायकवाड, राहुल मापाडे,अशोक माळेकर बाळू शिंदे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती

COMMENTS