ऊस प्रश्नावर शेतकरी कामगार पक्ष आक्रमक. - ऊसाचे ट्रॅक्टर अडवुन केले आंदोलन . माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अतिरिक्त उसाचा प्र...
ऊस प्रश्नावर शेतकरी कामगार पक्ष आक्रमक. - ऊसाचे ट्रॅक्टर अडवुन केले आंदोलन
. माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होत असताना जयमहेश साखर कारखाना पवारवाडी या कारखान्याने १४० वाहने गेटकेनला परभणी जिल्ह्यात टाकल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला असून याप्रश्नी शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालेला आहे याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ढालेगाव बंधाऱ्यावर गेट केनच्या ऊसाचे ट्रॅक्टर तब्बल तासभर अडवून भाई अँड. नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले, या आंदोलनानंतर कारखाना प्रशासनाने ०५ डिसेंबरपर्यंत गेट केनचे वाहने परत कार्यक्षेत्रात देण्याचे लेखी अश्वासन देऊन कार्यक्षेत्रातील ऊसाची तात्काळ गाळप करण्याचे लेखी दिल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने चालू असलेले आंदोलन दि ०५ डिसेंबर पर्यंत स्थगीत केले असून दि ०५ डिसेंबर प्रर्यंत गेट केनचे वाहने कार्यक्षेत्रात न आणल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पुन्हा कारखान्याचे वाहन रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाई अँड. नारायण गोले पाटील यांनी सांगितले या आंदोलनात संभाजी चव्हाण, राजेभाऊ घोडके, व्यंकट खुळे, शिरिष चव्हाण, भगीरथ शेजुळ, राहुल सोळंके, शाम सोळंके, दिलीप सोळंके, वशिष्ठ गोंडे, संतोष खेत्री, सुदर्शन हिवरकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.कारखाना प्रशासनाच्यावतीने विलास टेकाळे गोपाल मानधने पोलीस अधिकारी यांनी आंदोलकांची बैठक घेऊन गिरीश लोखंडे यांच्याशी फोनवर संवाद साधून लेखी दिल्यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी उसाच्या ट्रॅक्टरची,भली मोठी रांग होती

COMMENTS