अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करा - अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन छेडणार - अरूण राऊत

माजलगाव/प्रतिनिधी        अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने कडून घेतला अन शेतकर्‍यांना ...



माजलगाव/प्रतिनिधी

       अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने कडून घेतला अन शेतकर्‍यांना गाजा-वाजा करून राज्य सरकारने अनुदान जाहिर करत दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र अद्याप ही शेतकर्‍यांच्या खात्यात अनुदान वर्ग झालेले नसून ते अनुदान तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात यावे. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तहसिलदार यांना निवेदनाव्दारे दि.25 नोव्हेंबर रोजी भाजपा तालुकाध्यक्ष अरूण राऊत यांच्यासह शिष्टमंडळाने दिला आहे.

राज्यातील आघाडी सरकारने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना वेळावेळी भुलथापा देण्याचे काम केले आहे. परतीच्या पावसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, परिणामी शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली पिके जमिनदोस्त झाली. या शेतकर्‍यांना रब्बी पेरणीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. शासनकर्त्यांनी दिवाळीपूर्वी अनुदान देण्याचे जाहिर केले होते मात्र आज दिवाळभ होवून पंधरा दिवस लोटले आहेत. तरी शेतकर्‍यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्यात आलेले नाही. केंद्र सरकारने अनुदानापोटी राज्य सरकारला आपल्या वाट्यांची रक्कम दिलेली आहे. परंतू राज्य शासनाकडून अद्याप पर्यंत शेतकर्‍यांना अनुदान वाटप करण्यात आले नाही. शासनकर्त्यांनी तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग करावी. शेतकर्‍यांना सरसगट पिक विमा देण्यात यावा. शासकिय कापुस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावेत. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकर्‍यांना नवीन पिक कर्ज वाटप करावे. कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप करावे. माजलगाव शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्‍न मार्गी लावावा. माजलगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील स्मारकाचा प्रश्‍न मार्गी लावावा. शेतकर्‍यांना विज पुरवठा हा रात्रीचा बंद करून दिवसा करण्यात यावा आदी मागण्या निवेदनाव्दारे तहसिलदार यांना तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आल्या आहे. शेतकर्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करा

अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष अरूण राऊत, जिल्हा सचिव बबनराव सोळंके, डॉ.भगवान सरवदे, दिपक मेंडके, ईश्‍वर खुर्पे, बाळासाहेब क्षीरसागर,संतोष जाधव, बाबासाहेब शिंदे, अनिरूध्द सोळंके, ग्याना सरवदे, नामदेव मुळे, सुभाष कांबळे, विनोद लड्डा, सतिश राठोड, गणेश सातपुते, परमेश्‍वर काळे, अजय शिंदे, नितीन घायतिडक, महादेव फपाळ आदिंनी दिला आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group