नांदेड (विठ्ठल कल्याणपाड
मुखेड तालुक्यातील मौजे येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे गुत्तेदाराचा मनमानी कारभाराचा कळस शिगेला पोचल्याने आरोग्य केंद्राचे इमारत बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची चर्च्या येवती परीसरात होत आहे. ईमारत बांधकामात वाळूच्या ऐवजी डस्ट दगड धोड्याचा माती मिश्रीत चुरा वापरात येत असून शासन दगड धोड्याचा चुरा बांधकामस वापरण्यासाठी परवानगी देत असले तरी या कामात माती मिश्रीत होत असल्यामुळे येवती येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्राच्या ईमारत कालमर्यादा व गुणवत्ते बाबत प्रशन्न चिन्ह निर्माण झाला आहे.
येवती परिसरातील जनतेसाठी होत असलेले हे प्रार्थमिक आरोग्य केंद्र खूप महत्वाचे व सोईचे होणार असल्याने जनतेचे वेळोवेळी होत असलेले उपचार व सोईसुविधे बाबतचे हात आता संपणार आहेत. मात्र येवती येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्राचा पायाच घसरत असल्याचे संबधीत अधिकारी आणि लोक प्रतिनिधींच्या लक्षात का येत नाही असेही विचारना केली जात आहे. मुळ पायाभरणीसाठी उभारण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या
पिलेरच्या खपल्या निघाल्याने त्या जागी लिपण ही करण्यात येत आहे. माती मिश्रीत दगडाच्या बुकट्याचा वापर या कामात होत असल्याने अनेक वादाचे भवरे फेर धरताना दिसून येत आहेत. या कामावर संबधीत अधिकाऱ्यांचे नियंत्रण नावालाच उरल्याने गुत्तेदार सर्व यंत्रणा दावणीला बांधून जलद गतीने काम उरकण्याच्या घाईत असल्याचे दिसून येत आहे.
येवती आरोग्य केंद्राच्या ईमारत बांधकामासाठी अंदाजित तीन कोटी पन्नास लाखाचे बजेट असून गुत्तेदाराला रान मोकळे ठेवून याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने पळवा पळवी करत गुत्तेदार आपली पोळी भाजून घेत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

COMMENTS