माजलगाव/प्रतिनिधी
पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे विकासाभिमुख दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. अशा विकसनशील नेत्याला मतदान करा. सतिश चव्हाण हे कार्य कर्तृत्वावरच निश्चित हॅटट्रीक साधतील असा विश्वास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी व्यक्त केला आहे.
अशोक डक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सामान्य माणसांची काळजी घेणारे महाविकास आघाडीचे सरकार असून सर्व घटकांचा विकास हवा असेल तर सतीश चव्हाण हे अतिशय योग्य उमेदवार आहेत. सतीश चव्हाण यांच्या रूपाने मराठवाडा पदवीधर मतदारसंघांला सक्षम उमेदवार मिळालेला आहे. पदवीधर युवकांनी विकास समोर ठेवून सतीश चव्हाण यांना मतदान करावे असेही आवाहन सभापती डक यांनी केले आहे. दरम्यान, सतीश चव्हाण हे कार्य कर्तृत्वावरच निश्चित हॅटट्रीक साधणार आहेत असा ठाम विश्वास अशोक डक यांनी व्यक्त केला.

COMMENTS