जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली भाजप महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारानिमित्त वारंगा_फाटा येथे पदवीधर मतदारांच्या मेळाव...
जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
भाजप महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारानिमित्त वारंगा_फाटा येथे पदवीधर मतदारांच्या मेळाव्याला संबोधीत करतांना कळमनुरी चे माजी आमदार भाजपा नेते गजाननराव घुगे यांनी पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिरीष बोराळकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
गेल्या बारा वर्षात कोणत्याही पदवीधरांचे प्रश्नाची सोडवणूक झाली नाही. पदवीधरांच्या आणि मराठवाड्याच्या प्रश्नाची जाण असणारे हिंगोलीचे शिरीषजी बोराळकर यांनाच पहिल्या पसंतीचे मताधिक्य देऊन निष्क्रिय आमदाराला धडा शिकवावा असे आव्हान केले.
यावेळी सोबत आ.महेशजी हिरे ,आ तानाजीराव मुटकुळे,जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव,माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार,तालुकाध्यक्ष रुपेश कदम,पि.आर,देशमुख,के.के.शिंदे,अजय कदम,विकास कदम,संतोष कदम,विजय कदम,तुकाराम ढोणे,प्रल्हाद देवकते,राजकुमार जाधव,अविनाश कदम,सुरेश लोमटे,गजानन कदम यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS