परभणी ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील शिक्षक परिषदेच्या तालुका अध्यक्ष भगवान देवकते आणि सचिव रामकिशन (किशोर ) कटारे, सुनील राठोड, भगवान पावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे आणि शिक्षक आमदार विक्रम काळे,आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि21नोव्हेंबर रोजी परभणी जिल्हा मेळाव्यात राष्ट्रवादी शिक्षक संघात प्रवेश केला.यावेळी मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून अध्यक्ष आणि सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र दिले.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आधाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळाव्याचे शनिवारी दि.२१ नोव्हेंबर रोजी श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, खा.संजय जाधव, खा.फौजिया खान, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विक्रम काळे, माजी खा.तुकाराम रेंगे पाटील,मा.खा.सुरेश जाधव , मा.आ.विजय भांबळे, माजी.आ.मधुसूदन केंद्रे, महापौर अनिता सोनकांबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर माजी महापौर प्रताप देशमुख, माजी जी. प. अर्थ व बांधकाम सभापती अशोक काकडे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पंडीतराव चोखट, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, राष्ट्रवादी शिक्षक संघांचे जिल्हाध्यक्ष ,उपजिल्हा अध्यक्ष धनंजय भागवत,आदीसह जिल्ह्यातील राष्ट्रवादी, कांग्रेस व शिवसेनेचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्ग सेलचे पदाधिकारी उपस्थिती होती.
सतिश चव्हाण यांच्या प्रचारार्थ मराठवाड्यातील
महाविकास आघाडीचे सर्वच नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात विविध ठिकाणी पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. सतीशचव्हाण मागील बारा वर्षापासून पासून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या कार्यकाळात त्यांनी पदवीधर, शिक्षक, प्राध्यापक आदीची प्रलंबीत प्राधान्यक्रमाने मागी लावली. त्यामुळे येणा-या १ तारखेला होणा-या निवडणुकीत सतीश चव्हाण यांना प्रथम पसंतीथे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन महाविकास आपाडीच्या वतीने करण्यात आले आहे. आहे.

COMMENTS