केज दि २२(प्रतिनिधी)
पदवीधरांचे प्रश्न सोडवण्याची संधी द्या असे मत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे यांनी केज येथे संवाद दौऱ्यात व्यक्त केले.
प्रस्थापितांनी मात्र पदवीधरांचे प्रश्न कधीही पोटतिडकीने मांडले नाहीत बेरोजगारांना वाऱ्यावर सोडले.हे परिवर्तन घडवण्यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून पसंती क्रमांक एक देऊन तरुणांनी मला सेवा करण्याची संधी द्यावी जाहीरनामा हा केवळ कागदावर नसून 100% ते प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करत राहणार असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा बेरोजगारांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणार यासाठी प्रस्थापितांना शह देऊन ही क्रांतीची मशाल घेऊन आपण सर्वांनी तेवत ठेवण्याचे आवाहन केले.
संदीप थोरात त्यांनी बोलताना ग्रामीण भागातील पदवीधरांची नाळ जोडलेला मुंडे यांच्या पाठीशी सर्व तरुण मतदार खंबीरपणे उभा राहणार असल्याचे नमूद केले
यावेळी तालुक्यातील पदवीधर उपस्थित होते.

COMMENTS