शेतकरी कामगार विरोधी धोरणाविरुद्ध आजच्या देशव्यापी आंदोलनात *माजलगावात माकप प्रणित विविध कामगार संघटनांची जोरदार निदर्शने*

*माजलगाव दि.२६ ( प्रतिनिधी ):- *केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशातील विविध संघटनांनी दि. २६ नोव्हेंबर...

*माजलगाव दि.२६ ( प्रतिनिधी ):-

*केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशातील विविध संघटनांनी दि. २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची व आंदोलनाची हाक दिली होती त्यास प्रतिसाद देत माजलगाव मध्ये ही माकप च्या नेतृत्वाखाली किसानसभा ,शेतमजूर युनियन, सीटू,जनवादी महिला संघटना,डीवायएफ ,आयएसएफआय, आटोरिक्षा चालक मालक संघटना व इमारत बांधकाम कामगार संघटना सह तालुक्यातील शेतकरी व कामगारांनी उपविभागीय कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली.

केंद्रातील भाजप सरकारने भांडवली शेती व मुक्त बाजारपेठेचे बेगडी आकर्षण दाखवून शेती आणि शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचप्रमाणे कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली कामगार कर्मचाऱ्यांचे हक्क हिरावून घेऊन कामगार कर्मचार्यांवर बेकारीची कुऱ्हाड लादली जात आहे,केंद्रातील मोदी सरकारच्या जनविरोधी व भांडवलदारी आर्थिक धोरणामुळे देशात बेकारीची मोठी फौज निर्माण होऊन सर्वसामान्य माणसावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.अशा भांडवलदारी धोरणाविरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी देशातील विविध जनसंघटनानी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून देशव्यापी संप व आंदोलनाची हाक दिली होती त्यास माजलगावात ही मोठा प्रतिसाद देत माकपच्या नेतृत्वाखाली आज विविध संघटनानी उपविभागीय कार्यालयावर जोरदार निदर्शने करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

यावेळी केंद्र सरकारचे शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करा,प्रत्येक कमी उत्पन्न गटांतील गरजू कुटुंबाला दरमहा रु.७५०० अनुदान द्या.वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून चार हेक्टर पर्यन्त जमीन कासणाऱ्याच्या नावे करा.देवस्थान इनाम गायरान व वरकस जमिनी कसणाऱ्याच्या नावे करा.पीकविमा योजना सर्वंकष करून तिचा फायदा कंपन्यांना नव्हे शेतकऱ्यांना द्या.जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी व कारखान्यात स्थानिक तरुणतरुणींना व बेरोजगारांना ८० टक्के प्राधान्य द्या.पंतप्रधान घरकुल योजनेत ड यादीत ज्यांची नावे आली नाहीत त्यांची नावे पुरवणी यादीत नावे समाविष्ट करा.रोजगार शिक्षण आणि आरोग्याचा संविधानाच्या मूलभूत हक्कात समावेश करा.महिला दलित आदिवासी यांच्यावर अत्याचार करणाऱ्यावर ताबडतोब कार्यवाही करा.इत्यादी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी माकप चे तालुका सचिव कॉ.मुसद्दीक बाबा कॉ.दत्ता डाके कॉ.संदीपान तेलगड,यांच्या नेतृत्वाखाली कॉ.बळीराम भूमबे. कॉ.विनायक चव्हाण, कॉ,सुहास झोडगे,कॉ.बंडू गरड,कॉ.सयद रज्जक, कॉ.भगवान पवार,कॉ.सादेक पठाण, कॉ,रुपेश चव्हाण,कॉ,शिवाजी कुरे,कॉ.शेख समीर,कॉ,अशोक डाके,कॉ,रामा राऊत,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group