केज प्रतिनिधी : दि२६ केज तालुक्यातील मौजे जिवाची वाडी येथे जिल्हा परिषद , बीड शिक्षण विभाग समग्र शिक्षा अभियान योजनेतुन शाळा खोली बांधकाम २२ लक्ष रुपयाचे किंमतीचे चालु आहे . हे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असलेचे लक्षात येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन बांधकाम बंद करून तक्रार महिला सरपंच , श्रीमती कुसूम संदीपान कुटे यांनी गट शिक्षणाधिकारी , गट साधन केंद्र, केज देऊन कळविले की बांधकाम करत असताना वाळू नाही सिमेट कमी प्रमाणात वापरले , हंगामी वस्तीगृहात बोगस मुले दाखली , पालख सभा न घेता गुपची केली अध्यक्षांची निवड इत्यादी विषयी वरिष्ठांना निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत. जिवाची वाडी येथे इयत्ता १ते ७वी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे . शाळेचे पद्वाचे मुख्याधापक , श्री.विक्रम ठोंबरे असून ते व्यसनाधिन असुन ते पुर्ण वेळ नशेत आहेत , गेल्या दोन वर्षा पासुन शाळेची गुणवत्ता पूर्णता ढासळली याचा फायदा घेत जिवाची वाडी येथील स्थानिक रहिवाशी सहशिक्षक , श्रीराम मुरली चाटे यांनी गेल्या दोन वर्षा पासुन शाळेचा एक हाती पडध्या आडून सर्व कारभार स्वतःकडे घेऊन विक्रम ठोंबर यांना फक्त सहिचा मालक बनवले मग हंगामी वस्तीगृह , शालेय पोषन आहार , शाळेची सर्व बांधकाम इत्यादी सर्व योजनेचे कामकाज चाटे यांनी स्वतःकडे घेऊन केली. श्रीराम चाटे हे स्थानीक रहिवाशी असलेने गेल्या १२ वर्षात येणाऱ्या कोणत्याच मुख्याधापकास त्यांनी सुरळीत कारभार जमुदिला नाही. श्रीराम चाटे शिक्षक म्हणजे भ्रष्ठाचाराचा मास्टर मैड शिक्षक कार्यालयाला पण अशा मानसाची गरज असलेने कार्यालयाने ज्या ज्या ठिकाणी शाळांची नविन बांधकाम मंजूर होतील त्या त्या शाळेची बांधकाम करण्यासाठी खास करून श्रीराम चाटे यांचा आदेश काढले . उदाः तरनळी , बिक्कड वस्ती इत्यादी बांधकाम करण्यासाठी नेमणूक केली कालांतराने एक वर्षा पासुन लव्हुरी केंद्राचे केंद्रिय मुख्याधापक म्हणुन अतिरिक्त पद्भाभार देऊन टाकला कारण बांधकांम , बायोमॅट्रीक मशीन व परत केंद्राचा चणामणा या सर्व विषयाचा सखोल अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणजेच श्रीराम चाटे
सधा चालु असलेले शाळेचे बांधकाम वाळू विरहित निकृष्ठ दर्जाचे चालु असलेचे ग्रामस्तांनच्या लक्षात येताच माजी सरपंच ,महादेव उर्फ बाबा चौरे व इतर २०ते२५ ग्रामस्थानी एकत्र येऊन बोधकाम बंद करत सरपंच यांनी निकृष्ठ बांधकामाची गुण नियंत्रण विभाकडून व हंगामी वस्तीगृहाची चौकशी करण्याची लेखी मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे .

COMMENTS