चिमुकल्याच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले,हिरकणी झाली कोरोनामुक्त.
वड़वणी /जगदीश गोरे
संपुर्ण जगात कोरोनाने थैमान घातले. महाराष्ट्रातही कोरोनाचे संक्रमन तेजीत होत असतांना सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले. संकटकाळी ज्याच्याकड़े धावा केले जातो. ते देवही बंदिस्त करण्यात आले. अशा भिषण परिस्थीतीत ड़ाॅक्टर,नर्स रूग्णांच्या मदतिला धावुन पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवले. शेवटी कोविड़ योद्धा म्हणुन काम करणार्या नर्स सौ. अल्का नितीन बड़े यांना कोरोनाची लागण झाली. चिमुकल्याच्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणार्या नर्स अल्का नितीन बड़े करोना मुक्त झालेल्याने त्यांचे गावात जोरदार स्वागत करण्यात
हा कोरोणा जगात आला, आणि सर्व वैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्यांना त्याने आव्हान दिले. अल्का बड़े सिस्टर असल्याने थोडी सामाजिक जबाबदारी त्यांच्यावर ही आली. आणि ती पेलण्यास त्याही ही सज्ज झाल्या. शेवटी आपली मदत या अशा भयंकर काळात समाजाला होणार. याचा आनंद झाला.
आव्हान अवघड होतं. पण धैर्य आणि इच्छेमुळे त्या दररोज कर्तव्य बजावत होत्या. येवढे दिवस स्वतःला या महामारी पासून सांभाळले.
परंतु आता त्या आठ महिन्यांची गरोदर असतांना करोनाने त्यांनाही विळख्यात घेतले. रूग्णांची सेवा करत असतांना त्या कोरोनाग्रस्त झाल्या.गरोदर माताच्या मनात गोधंळ निर्माण झाला.मी एका बाळाची आई आहे. त्या सोबतच मी जगत जननी आहे. कोरोनावर मात करायची अशी खुणगाठ बांधली. करोनाला न घाबरता धैर्याने त्याचा मुकाबला केला. व पाहता पाहता त्या कोरोना मुक्त ही झाल्या. कोरोनावर यशस्वी पणे मात करणार्या नर्स सौ. अल्का नितीन बड़े. यांचे चिचंवण येथे जोरदार स्वागत करण्यात आले.

COMMENTS