मादळमोही दि,१७ (संतोष भारती):-- शिरुर कासार तालुक्यातील निमगांव ( मांयबा) येथिल सिंदफणा नदीवर तहसिदार यांच्या आशीर्वादाने अवैद्य वाळु तस्कारी होत असुन महसूल प्रशासानाचे वाळु तस्कारीशी लांगेबाधें मुळे महसुल बुडवत गोरक धंदा तेजित सुरु आहे, शिरुर कासार तहसिलदार यांना निवेदन देवुनही काहीच कारवाई होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसिलदार यांच्या निलंबनासाठी आदोंलन करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे,
या बाबत असे की, शिरुर कासार तालुक्यातील अनेक गांवातुन सिदफणा नदी लगत आहेत, पंरतु कसल्याचे प्रकारे वाळु विक्री लिलावे.नसतांनाही महसुल प्रशासन व तहसिदार यांच्या आशीर्वादाने वाळु माफीया जेसबी,केनी टँक्टर व मजुरांच्या सहाय्याने दिवसाढवळ्या अवैद्य वाळु उत्खनन करुन लाखोच्या महसुलावर डल्ला मारत आहेत,विशेष म्हणजे वाळु तस्कर कोणाचीही परवा न करता भरधाव वेगाने वाळु वाहतूक करत आसल्याने पदाचार्यांना जिवमुठीत धुरुन चालावे लागत आहे,वाळु तस्करीचे व महसुल प्रशासनाचे लांगेबाधें असुन हाप्तेखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे लाखो रुपायाच्या महसुलावर मिलीभगत करत दरोडा सर्रास टाकला जात आहे,याचा त्रास नाहक सर्वसामान्याला होत आहे, शिरुर कासार तालुक्याच्या तहसिलदार यांना सतत कल्पना देवुनही कारवाई होत नसल्याने महसुल प्रशासनावरील विश्वास कमी होत आहे, वाळु लिलावे होत नसल्याने सर्वसामान्य जनतेला चढा भागात घरबांधणी वाळु विकत घ्यावी लागते, शासनाचे सर्वांनसाठी घरे बांधण्याचे धेय्य धोरण आसले तरीही चढ्या भावाने वाळु घ्यावी लागत आहे, त्यामुळे महसुल प्रशासन शासनाच्या विरोधात तर नाही ना,असा सवाल पुढे येत आहे, या अन्याया विरोधात वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला आहे,
तहसीलदार वाळु तस्काराची मिलीभगत
----------------------------------------
तहसिदार हे न्याय दंडाधिकारी आसतात, पंरतु न्याय मागण्यासाठी गेल्या नंतर त्यांच्यावरच अन्याय होत आसेल तर न्याय कोणाकडे मागयांचा अशा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे, दिवसाढवळा वाळु उत्खनन होत आसतानाही तहसिदार काहीच करत नसतील तर नक्कीच वाळु तस्कर आणि तहसिदार यांचे लांगेबाधें आहेत असेच म्हणावे लागेल,

COMMENTS