सरपंच अतुल कोठुळे यांचे अथक परिश्रम
आष्टी(दादासाहेब बन)आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी म्हणून ओळखली जाणारी कासारी मुर्शदपुर शिदेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शिदेवाडी गावांमधील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर व पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यात आले होते .परंतु या विहिरीवरील विद्युत पंपाला विद्युत पुरवठा जोडणी पूर्ण न केल्याने ही योजना बंद पडली होती. नागरिकांची गैरसोय निर्माण झाली या समस्या विषयी शिदेवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करतात सरपंच अतुल कोठुळे व ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार सुरेश धस यांच्याकडे विद्युत कनेक्शन जोडणी बाबत चर्चा केली असता आमदार सुरेश धस यांनी विद्युत महावितरण च्या अधिकाऱ्याला तात्काळ हा प्रश्न सोडण्याचे सांगताच संबंधित अधिकाऱ्याने सहकार्य केले . हे काम पुर्ण करण्यासाठी सरपंच अतुल कोठुळे, ग्रा प सदस्य सचिन काकडे ,पत्रकार दादासाहेब बन ,राजू गीते ,भैरवनाथ चव्हाण यांच्या सततच्या पाठपुराव्याने व प्रत्यक्ष दिवसभर उभा राहुन गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित विद्युत कनेक्शन प्रश्न मिटवला.या कामामुळे आ.सुरेश धस,महावितरणचे अधिकारी पवार,सरपंच,उपसरपंच व सदस्याचे शिदेवाडी ग्रामस्थांनी अभार व्यक्त केले.
COMMENTS