*
=================
केज! प्रतिनिधी
अतिवृष्टीने शेतकर्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकर्यांना सरकारने भरीव मदत करावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केज तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात आले.तसेच अंबाजोगाई येथे निवेदन देण्यात आले असे होवून ही केज मतदारसंघ मदतीपासुन वंचित ठेवण्याचे प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा करीत असल्याचे ऐकावयास मिळत आहे.तेंव्हा पालकमंत्र्यांनी मदतीच्या यादीतून केज मतदार संघ वगळू नये अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात संभाजी ब्रिगेडला भूमिका घ्यावी लागेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी दिला आहे.
या बाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने 1 ऑक्टोबर रोजी केज आणि परळी विधानसभा मतदार संघातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना हेक्टरी पन्नास हजार रूपये आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.यावर्षी वेळेवर पाऊस पडला.परंतु,मध्येच पावसाने उघडीप दिली.पिके काढावयास आली असताना अतिवृष्टीने थैमान घातले.सोयाबीन,ऊस, बाजरी, भूईमुग,कापुस,कांदा या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 80 टक्के एवढे नुकसान केज व परळी मतदारसंघात झाले आहे. यांचे रितसर पंचनामे महसुल प्रशासनाने करून शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रूपये द्यावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी निवेदनाद्वारे केली होती. त्यानूसार बीड जिल्ह्यात पंचनामे होत आहेत.शेतकर्यांना मदत करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.परंतु,बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मात्र अचानकपणे केज मतदारसंघाचा संपुर्ण भाग व आष्टी पाटोदा मतदारसंघाचा काही भाग वगळुन मदत करण्याची भूमिका घेतली की काय.? अशी शंका येत आहे.कारण,अद्याप केज मतदारसंघात नुकसानीचे पंचनामे करण्याचे नाटक सुरू आहे असे दिसते.28 हजार बागयती व 10 हजार रूपये जिरायती दिवाळीच्या पुर्वी मदत निधी शेतकर्यांना मिळावा.अन्यथा या प्रश्नावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेण्यात येवून जिल्ह्यात तिव्र आंदोलन करण्यात येईल.अशा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी आमच्या प्रतिनिशी बोलताना दिला आहे.
COMMENTS