----------------------------------------------------------
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील मौजे हसनाळ प.मू येथे पुनर्वसन पाहणी दौरा तालुका दंडाधिकारी तथा दंडाधिकारी तहसीलदार काशिनाथ पाटील व तलाठी जां बळे,ग्रामसेवक जीरगे, गावातील सर्व नागरिक उपस्थित होते,यावेळी गावातील नागरिक यांच्यासोबत प्रत्येक्ष पाहणी प्राथमिक चर्चा केली यावेळी नागरिकांनी अन्य जीवनावश्यक पायाभूत सुविधा साठी शाळा,स्मशानभूमी,रस्ते,पाणी,वीज या चर्चा सुरू करण्यात आली.
या बैठक व पाहणी दौऱ्यात प्रमुख्याने सर्व प्रकारच्या प्राथमिक गरजा ,यावेळी सर्व गावातील पुनर्वसन यादी आणि स्वच्छ सरकारी पुनर्वसन तपासणी करण्यात आली यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक तथा तंटामुक्ती अध्यक्ष शशिकांत देशपांडे यांनी महिला संपती मध्ये समानता तर वारसा हक्क कायदा बाबत महिलांना पण वारसा हक्क मिळाला पाहिजे, या बाबीकडे प्रशासन व नागरिकांना यामध्ये चर्चेचा विषय केंद्रबिंदू ठरला.
या वेळी गावातील नागरिकांनी अन्य गावातील समस्या वर ही तहसीलदारांना धारेवर धरले , काही नागरिकांना समस्या आणि नागरिकांनी काही निराधार, वयोवरांध व्यकी चे सहा महिने पासून रखडलेले महीना रक्कम जमा झाली नाही याबाबत पण नागरिकांनी चर्चा केली, सर्व प्रश्न सोडवण्यात येतील असे आश्वासन तहसीलदार साहेबांनी येथील नागरिकांना दिले, माऊली मंदिर हसनाळ येथील खासगी पुनर्वसन गटविकास अधिकारी व आम्ही सर्व अधिकारी मिळून मार्गी लावू असे सांगण्यात आले..यावेळी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. ग्रामीण पत्रकार दिलीप मादाळे हे यावेळी उपस्थित होते .
COMMENTS