धर्माबाद (अहमद लड्डा) येथील रहिवासी, उर्दू हायस्कूल चे संस्थापक, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी, तथा पेन्शनर्स असोसिएशनचे ता. अध्यक्ष मं. जबारोद्दीन मं. वजीरोद्दीन यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोरोना लाक डाऊन मुळे काही दिवसांनी पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने उर्दू हायस्कूलमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
या शोकसभेत सचिव शंकरराव कामीनवार, रमेश वाळकीकर, सी. एन. वाघमारे, चौधरी शेख हुसेन, जॅकीउद्दीन सर, नां.भारत स्काऊट गाईडचे जिल्हा सचिव बालाजी कुदाळे, मोहम्मद जावीद सर यांनी शोकसभेत आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पेन्शनर्स असो. उपाध्यक्ष जि.पी. मिसाळे होते,
या कार्यक्रमास जी,बी, पांचाळ, प्रा. शरद वट्टमवार, गंगाधर चातरमल, कदम भगवान, विठ्ठलराव रटकलवार, सिद्धार्थ वाघमारे, सय्यद युनूस अल्ली हुसेन अल्ली, उपस्थिती होती.
सूत्रसंचालन व आभार सचिव शंकरराव कामिनवार यांनी मानले.
COMMENTS