नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) येथील रहिवासी तथा उदगीर येथील साहित्यिक,पत्रकार शंकर बोईनवाड यांच्या ' कोल्हेवाडीचा बाजार 'ह्या दुसऱ्या बालकविता संग्रहाचे प्रकाशन दि.1 नोव्हेंबर 2020 रोजी लातूर येथील कै. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झाले .
चला कवितेच्या बनात या साहित्यिक आणि शैक्षणिक चळवळ उदगीरच्या वतीने संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अविनाश मोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संकल्प बहुउदेशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजीव सोनवणे हे उपस्थित होते .या कार्यक्रमास ज्येष्ठ समीक्षक किशन उगले,लातूरचे कवी संजय घाडगे,चित्रकार कवी दतकुमार स्वामी,प्रा.सुरेश शिंदे व संयोजक अनंत कदम यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अविनाश मोरे,किशन उगले, संजय घाडगे,दत्त कुमार स्वामी यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचलन चला कवितेच्या बनातचे संयोजक अनंत चंपाई माधव कदम यांनी केले तर दत्त कुमार स्वामी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
COMMENTS