नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
*संपूर्ण विश्व कोरोणासारख्या आजाराने ञस्त असताना आणि स्वतः कोरोणा आजाराने ग्रस्त असताना लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी राम पाटील रातोळीकर यांनी उचलली. याच जनसेवेच्या भावनेतून आज नायगांव ग्रामीण रुग्णालयाला एक रुग्णवाहिका आणि तीस खाटांचे लोकार्पण आ.राम पा.रातोळीकर यांच्या निधीतून केले.*
*भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष माणिक लोहगावे यांच्या हस्ते फित कापून रुग्णवाहिका अर्पण करण्यात आली. तर तिस खाटांचे लोकार्पण भाजपा नेते बालाजी बच्चेवार यांच्या हस्ते करण्यात आले.*
*या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती प्रतिनिधी विठ्ठलराव कत्ते, भाजपा नेते प्रा.जीवन पा.चव्हाण, तालुकाध्यक्ष कोंडीबा पाटील, माजी चिटणीस अवकाश धुप्पेकर नामदेव कांबळे होते..*
*तसेच यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गुंटूरकर, भगवान लंगडापूरे, पांडू पा.कल्याण, व्यंकटराव चव्हाण, शिवाजी वडजे, शंकर कल्याण, हरीचंद चव्हाण, शंकर तमनबोईनवाड, अविनाश चव्हाण, राजेंद्र सोनकांबळे, लक्ष्मण कंदुर्के, रवी पवळे, नामदेव वजीरगावे, अनिकेत शिंदे, शिवाजी ढगे, संतोष भालेराव, प्रल्हाद भालेराव, मोईन मुल्ला, डॉ.देवणीकर, डॉ.पोहरे, डॉ. कोठाळकर, डॉ. बिडवई, डॉ. जयाद्दुला खान, डॉ.वाघमारे, सिस्टर पेरके, सिस्टर संगेवार, कार्यालय अधिक्षक वाघमारे, लिपिक तोटावार, रुग्णवाहिका ड्रायव्हर हंपले, सेवक मोरे यांची उपस्थिती होती.*
COMMENTS