प्रतिकुल परिस्थितीवर मात करून शेख जुनेद या दिव्यांगांची एमबिबिएसला निवड


 


नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )


हदगाव शहरात अती गरीब घराण्यात जन्म घेतलेल्या शेख जुनेद या दिव्यांगांचे वडिल ऑटो चालवुन आपला व आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह भागवतात जन्मताच दिव्यांग असलेल्या जुनेदला अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जिवाचे रान करावे लागले तरी सुद्धा प्रमाणपत्र मिळाले नव्हते तेंव्हा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे मराठवाडा अध्यक्ष फेरोज खांन महंमद अली खान यांना संघटणेचे हदगाव तालुका अध्यक्ष निहाल पटेल यांनी सविस्तर कळविले असता फेरोज खांन यांनी कुठलीच पर्वा न करता शेख जुनेद यांना थेट नांदेड येथील डाॅ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नेऊन अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढुन देण्यात सिंहाचा वाटा उचलला त्याचेच फलीत म्हणुन शिक्षणात हुशार असलेला दिव्यांग शेख जुनेद यांने थेट एमबिबिएसलाच मजल मारत गोरगरीब आई वडील भाऊ बहीण आणि फेरोज खांन यांचे नाव उज्वल केले याच्याच अणुशंगाने आज दि १७ नोव्हेंबर २०२० रोजी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती हदगाव कडुन मराठवाडा अध्यक्ष फेरोज खांन महंमद अली खान यांनी मौलाना अब्दुल कलाम आझाद शादि खाना येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता या सत्कार समारंभाच्या अध्यक्षपदि दैनिक भास्कर या वर्तमानपत्राचे हदगाव तालुका प्रतिनिधी शेख चांद पाशा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे यांच्या सह हदगाव तालुका अध्यक्ष निहाल पटेल व समीतीचे पदाधिकारी तरुण भारत चे शेख जुनेद. युवा निर्णय संपादक कुरेशी जमिल अहमद . एम सी एन न्यूज चॅनेल चे प्रतिनिधी शेख शहबाज सर्व पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते शेख अहमद जाऊस काँग्रेसचे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख. बिलाल भाई. शेख बाबू भाई आज तक. व सर्व मित्र मंडळी उपस्थित होते.


सर्वांनी आप आपल्या स्तरावरून मनोगत व्यक्त करून शेख जुनेद या दिव्यांगांस पुढिल शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.


टिप्पण्या